Mahabaleshwar : स्व.बाळासाहेब भिलारे यांच  ऋण पक्ष कधीही विसरणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Homeताज्या बातम्या

Mahabaleshwar : स्व.बाळासाहेब भिलारे यांच ऋण पक्ष कधीही विसरणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी महाबळेश्वर बाळासाहेब भिलारे हे पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी सातत्याने पक्षाला बळकटी द

भुजबळांनाच पालकमंत्री करा! नाशिकच्या खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, राजकारण तापलं
अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले विरोधी पक्षनेते.
परंपरेला तडा! संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढला; ८ कोटींच्या रथाचे नुकसान

प्रतिनिधी महाबळेश्वर

बाळासाहेब भिलारे हे पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी सातत्याने पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. आ.शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांची मश्वर तालुक्याची संपूर्ण जबाबदारी भिलारे दादांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.दादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांबरोबर पक्षाची हानी झाली असून दादांचे ऋण पक्ष कधीही विसरू शकणार नाही.

अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (ajit pawar) यांनी बाळासाहेब भिलारे (balasaheb bhilare) यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , आ.शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, प्रवीण भिलारे, यांच्यासह तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS