Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री

सातारा / प्रतिनिधी : मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी कोरोना रूणांची संख्या वाढत चालली आहे. रुग्ण संख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना

शेंद्रे-कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन
लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन

सातारा / प्रतिनिधी : मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी कोरोना रूणांची संख्या वाढत चालली आहे. रुग्ण संख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, निर्बंध लादून पुन्हा लॉकडाउन करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा येथे दिला. येथे राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार सातार्‍यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाची पहाणी आणि उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पश्‍चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. राज्यातही कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काळजी घेणे गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार
अनेक राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आले आहे. आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो, त्यावेळी आपण एकमेकांच्या समोर येतो, त्यावेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS