आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

आज २३ ऑगस्ट

मेष:- मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनला

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष:- मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो. शुभ रंग पांढरा शुभ अंक २

वृषभ:- अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. शुभ रंग गुलाबी  शुभ अंक  ४

मिथुन:- मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील. शुभ रंग पोपटी   शुभ अंक ७

कर्क:- धरसोड वृत्ती टाळावी लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्यावी.  मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल. शुभ रंग विटकरी  शुभ अंक १

सिंह:- इतरांचा विश्वास संपादन कराल. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील.शुभ  रंग जांभळा  शुभ अंक  ३

कन्या:- मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ रंग लाल   शुभ अंक ९

तूळ:- कौटुंबिक वातावरणात रमाल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल. शुभ रंग निळा  शुभ अंक ५

वृश्चिक:- तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत.  कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल. शुभ रंग हिरवा  शुभ अंक  ८

धनू:- इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत. शुभ रंग पिवळा  शुभ अंक १

मकर:- डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. शुभ रंग काळा  शुभ अंक ४

कुंभ:- जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा. शुभ रंग नारंगी शुभ अंक ६

मीन:- चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा. शुभ रंग हिरवा  शुभ अंक ७

COMMENTS