आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज ४ संप्टेंबर

मेष:- सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी. शुभ रंग

आज १४ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष:- सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी. शुभ रंग पांढरा शुभ अंक  २

वृषभ:- संयमाची गरज भासेल. अडचणीतून मार्ग काढता येईल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. अनावश्यक खर्च टाळावेत. शुभ रंग गुलाबी शुभ अंक  ४

मिथुन:- बोलतांना संयम राखावा. मनातील चुकीचे विचार बदलून टाका. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका. शुभ रंग पोपटी शुभ अंक ६

कर्क:- थोरांचे विचार जाणून घ्या. भावंडांचे सहकार्य मिळेल. जवळचे मित्र भेटतील. मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा. शुभ रंग विटकरी शुभ अंक ८

सिंह:- सडेतोडपणे वागून चालणार नाही. मनाची द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा. शुभ रंग जांभळा शुभ अंक  १

कन्या:- ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या  वेळी निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. शुभ रंग लाल शुभ अंक ३

तूळ:- वैचारिक एकसूत्रता ठेवावी. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे. उगाच चिंता करत बसू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल. शुभ रंग निळा शुभ अंक ५

वृश्चिक:- कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.  उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ रंग हिरवा शुभ अंक ७

धनू:- जुनी गुंतवणूक कामी येईल. मन प्रसन्न राहील. नवीन योजनांवर विचार करावा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल. शुभ रंग पिवळा शुभ अंक ९

मकर:- चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. शुभ रंग काळा शुभ अंक ४

कुंभ:- योग्य तर्क वापरावा लागेल. भांडणापासून दूर राहावे. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल. शुभ रंग नारंगी शुभ अंक ३

मीन:- वाहन वेगावर मर्यादा घालावी. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. शुभ रंग पोपटी शुभ अंक १

COMMENTS