Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : ना. बाळासाहेब पाटील

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा महाबळेश्‍वर येथे संपन्नसातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्रा

वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?
गुढेपाचगणी पठारावरील डोंगर पेटले की पेटवले? ; आगीत चार्‍यासह सरपटणारे प्राणी भस्म

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा महाबळेश्‍वर येथे संपन्न
सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून येथे उत्पादित होणार्‍या स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन कोठेही होत नसून या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. स्ट्रॉबेरीला प्राप्त भौगोलिक मानांकनाचा उत्पादकांना जास्तीत-जास्त लाभ होण्यासाठी उत्पादकांनी एकत्र येऊन पणन मंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा. एकत्रित येऊन विक्री तंत्र अवलंबवावे, असे आवाहन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत स्ट्रॉबेरी पीक उत्पादन, सुगी पश्‍चात हाताळणी, विपणन, प्रक्रिया संबंधी कार्यशाळा भिलार, ता. महाबळेश्‍वर येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ना. पाटील बोलत होते. कार्यशाळेस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, पणनचे सह सचिव डॉ. धपाटे, कृषीचे उपसंचालक विजय राऊत, कृषी व पणन विभागाचे अधिकारी तसेच महाबळेश्‍वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, स्ट्रॉबेरी ही महाबळेश्‍वरची नवीन ओळख आहे. यासाठी स्व. बाळासाहेब भिलारे व येथील शेतकर्‍यांनी प्रयत्न केले आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांचे उत्पादन वाढून त्यांना आधिकाचा फायदा व्हावा. यासाठी राज्य शासनाच्या मँग्नेट प्रकल्पात स्ट्रॉबेरीचा समावेश केला आहे. मँग्नेटसाठी स्ट्रॉबेरी पिकासंबंधी महाबळेश्‍वर भागातील दोन संस्थांचे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या काढणी पश्‍चात हाताळणीसाठी प्रशितकरण, शीतगृह, पॅक हाउस, शीतवाहन, प्रक्रिया युनीट इत्यादी सुविधा निर्माण होणार आहेत. मॅग्नेट अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकाची शास्त्रोक्त लागवड, काढणी पश्‍चात हाताळणी, विक्री व प्रक्रिया यासाठी उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था व इतर घटकांना मार्गदर्शन व्हावे. यासाठी स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिका येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS