Homeताज्या बातम्या

खा. ओमराजे निंबाळकर गेम फिरवणार ?उद्धव ठाकरेंनी फोन करून केली मनधरणी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापले असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यां

जयहिंद लोक चळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये शनिवारी व रविवारी खा.सुप्रिया सुळे,सत्यजीत तांबेंसह विविध मान्यवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन
जगासाठी हे दशक आपत्तीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना, युद्धांनंतर जागतिक ऊर्जा संकटाकडे वेधले लक्ष


मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापले असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत असल्याने त्यांच्या निर्णयावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हेच आगामी घडामोडींमध्ये ‘गेम फिरवणारे’ ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर ओमराजे निंबाळकर पुण्यातील निवासस्थानी परतले. त्यानंतर त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या एका निर्णयामुळे सध्याचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे ठाकरे गटानेही हालचाली वाढवल्या आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ओमराजे यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पक्षाचे काही प्रमुख नेते भेटल्याचेही सांगितले जाते. या भेटीत विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते.
राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ओमराजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे. या संवादात पक्षातील स्थिती, स्थानिक प्रश्‍न आणि भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या वेळी ओमराजे निंबाळकर यांनी पक्षामुळेच आपल्याला राजकीय ओळख मिळाल्याची भावना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. आमदारकीपासून खासदारकीपर्यंतचा प्रवास पक्षाच्या पाठबळामुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना आणखी उधाण आले आहे.
ओमराजेंच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
राजकीय विश्‍लेषकांच्या मते, ओमराजे निंबाळकर यांची भूमिका ही केवळ एका खासदाराचा निर्णय नसून त्याचा परिणाम व्यापक राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. त्यांनी कोणती दिशा स्वीकारली यावर पुढील राजकीय घडामोडींचा वेग आणि स्वरूप अवलंबून राहणार आहे. धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांसोबत होणारी बैठक त्यामुळे विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता असून, त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत.
ऑपरेशन टायगर सहाव्या खासदारावर अवलंबून
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे ओमराजे निंबाळकर हे राज्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. एकीकडे विविध पक्षांकडून त्यांच्याशी संवाद साधला जात असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत येणारा त्यांचा निर्णय केवळ धाराशिवपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो. कारण एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आले. त्यासाठी किमान सहा खासदारांची गरज असतांना सहावा खासदार जर ठाकरेंकडे राहिल्यास ऑपरेशन टायगर फसू शकते, किंबहूना शिंदे सेनेवर मोठी नामुष्की ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

COMMENTS