Homeताज्या बातम्या

किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी

किनवट : किनवट तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर रात्रीच्या अंधारात ’लक्ष्मी दर्शनाने’ सोडून दिल्याची धक्कादायक बाब एक

महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
बीडमधील उमेश दळवी हत्या प्रकरण: किनवटमध्ये तीव्र संताप, आरोपींना फाशी देण्याची मातंग समाज व जातीअंत संघर्ष समितीची मागणी
किनवट-माहूरच्या वीज समस्यांवर आमदार भीमराव केराम आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती, १०० गावांत नवीन खांब बसवण्याचे कडक निर्देश

किनवट : किनवट तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर रात्रीच्या अंधारात ’लक्ष्मी दर्शनाने’ सोडून दिल्याची धक्कादायक बाब एका व्हायरल व्हिडिओद्वारे समोर आल्यानंतर या प्रकरणाने आता मोठे राजकीय आणि प्रशासकीय वळण घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून, येत्या २९ मे रोजी या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

तालुक्यात रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे रेती उपसा केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. यावर महसूल विभागाने कारवाई करत काही रेतीचे ट्रॅक्टर्स जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. नियमाप्रमाणे यावर दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, एका रात्री तहसीलदारांच्या अधिकृत सरकारी गाडीचा ड्रायव्हर अचानक ‘ॲक्टिव्ह’ झाला आणि त्याने आवारातील जप्त केलेले ट्रॅक्टर थेट रस्त्याला लावून गायब केले. या संपूर्ण ‘रात्रीच्या खेळाचा’ एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रत्येक ट्रॅक्टरमागे ५० ते ७० हजार रुपयांचे ‘सेटलमेंट’ करून हे ट्रॅक्टर सोडण्यात आल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. केवळ एक साधा ड्रायव्हर स्वतःच्या हिमतीवर एवढे मोठे धाडस करू शकत नाही, यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच वरदहस्त असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

महसूल मंत्र्यांकडे तक्रार व नोटीस: या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते माणिक गणपत मुंढे (रा. निचपूर) यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुराव्यासह (व्हायरल व्हिडिओ क्लिप) लेखी तक्रार दाखल केली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय किनवट यांनी किनवटच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, आपले म्हणणे मांडण्यासाठी २९ मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

आता नेहमीप्रमाणे केवळ ड्रायव्हरला ‘बळीचा बकरा’ बनवून वरिष्ठ अधिकारी नामानिराळे होणार, की या ‘महा-सेटलमेंट’च्या पडद्यामागच्या खऱ्या सूत्रधारांवर (तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी) कडक कायदेशीर कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS