Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“नरभक्षक बिबट्या ठार मारा! माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा थेट वन मंत्र्यांना फोन

https://www.youtube.com/watch?v=XLaKx2NEXmQ कोपरगाव : टाकळी फाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण

मोबाईलसाठी गळफास घेवून संपवले जीवन
सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वडूज पोलीस स्टेशनकडून परत
सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना शासन आणणार : मुख्यमंत्री फडणवीस

कोपरगाव : टाकळी फाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नुकताच साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे.

या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर–मनमाड महामार्ग ठिय्या आंदोलन करून बंद पाडला आहे. प्रशासन आणि वनविभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने या परिसराला ‘बिबट्या प्रभावित क्षेत्र’ घोषित करण्याची मागणी केली आहे.

स्नेहलताताईंनी वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा वनरक्षक अधिकारी सालविठ्ठल, तहसीलदार महेश सावंत, तसेच वनाधिकारी रोडे यांच्याशी चर्चा करून तातडीने नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरे लावून सतत गस्त घालावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

COMMENTS