Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवळगावमध्ये ग्रामस्वच्छता करत भक्तीचा जागर

श्रीगोंदा :  तालुक्यातील ढवळगाव येथे मकर संक्रांत व षट्तिला एकादशीच्या निमित्ताने केवळ धार्मिक विधींवर न थांबता सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी मंदिर व ग्रामपंचायत परिसरात स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचे श्रमदान केले. कोणताही गाजावाजा न करता राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भक्तीचा खरा अर्थ समाजासमोर आला. या पवित्र दिवशी भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात; मात्र देवाच्या दर्शनासोबतच परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील भक्तीच असल्याचे ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले. मंदिर व सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या श्रमदानामुळे परिसर स्वच्छ व प्रसन्न झाला.  षट्तिला एकादशीच्या निमित्ताने तीळदान, उपवास व जपाला विशेष महत्त्व असते. मात्र, आजच्या काळात सेवाभावातून समाजासाठी योगदान देणे अधिक आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. स्वच्छ मंदिर, स्वच्छ गाव आणि स्वच्छ सार्वजनिक परिसर हेच खऱ्या श्रद्धेचे प्रतीक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.  या उपक्रमामुळे भक्ती आणि सेवा यांची सांगड घालण्याचा संदेश मिळाला असून, सण-परंपरांना सामाजिक अर्थ देण्याचा आदर्श ढवळगावच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
कला कधीच उपाशी राहू देत नाही : प्रा.  सोनवणे

श्रीगोंदा :  तालुक्यातील ढवळगाव येथे मकर संक्रांत व षट्तिला एकादशीच्या निमित्ताने केवळ धार्मिक विधींवर न थांबता सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी मंदिर व ग्रामपंचायत परिसरात स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचे श्रमदान केले. कोणताही गाजावाजा न करता राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भक्तीचा खरा अर्थ समाजासमोर आला.

या पवित्र दिवशी भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात; मात्र देवाच्या दर्शनासोबतच परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील भक्तीच असल्याचे ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले. मंदिर व सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या श्रमदानामुळे परिसर स्वच्छ व प्रसन्न झाला.

 षट्तिला एकादशीच्या निमित्ताने तीळदान, उपवास व जपाला विशेष महत्त्व असते. मात्र, आजच्या काळात सेवाभावातून समाजासाठी योगदान देणे अधिक आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. स्वच्छ मंदिर, स्वच्छ गाव आणि स्वच्छ सार्वजनिक परिसर हेच खऱ्या श्रद्धेचे प्रतीक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 या उपक्रमामुळे भक्ती आणि सेवा यांची सांगड घालण्याचा संदेश मिळाला असून, सण-परंपरांना सामाजिक अर्थ देण्याचा आदर्श ढवळगावच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

COMMENTS