Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कासट,मानधने चांडक यांची जिल्हा माहेश्वरी सभेवर वर्णी

माजलगाव प्रतिनिधी - माजलगाव तालुका माहेश्वरीचे सदस्य  असलेले रमेशचंद्र कासट,सागर मानधने व रमेश चांडक यांची जिल्हा महेश्वरी सभेच्या नूतन कार्यकरिण

चक्क ! 35 ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड LOKNews24
निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त
अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांविरूध्द गुन्हा | DAINIK LOKMNTHAN

माजलगाव प्रतिनिधी – माजलगाव तालुका माहेश्वरीचे सदस्य  असलेले रमेशचंद्र कासट,सागर मानधने व रमेश चांडक यांची जिल्हा महेश्वरी सभेच्या नूतन कार्यकरिणीवर सोमवारी अंबाजोगाई येथे झालेल्या निवड बैठकीत वर्णी लागली.विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी संजय मंत्री,जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश भुतडा यांनी या निवडी जाहीर केल्या.
अंबाजोगाई येथे 10 एप्रिल रोजी जिल्हा माहेश्वरी सभेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यात जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे ऍड श्रीकृष्ण तोष्णीवाल तर जिल्हासचिव पदी जगदीश जाजू यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी माजलगाव चे रमेशचन्द्र कासट यांची जिल्हाउपाध्यक्ष, सागर मानधने यांची जिल्हा सहसचिव,तर रमेश चांडक यांची जिल्हा माहिती व प्रचार मंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पूर्व प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी,सी ए एस पी लड्डा,जेष्ठ समाजसेवक नन्दकिशोर मुंदडा, जुगलकिशोर लोहिया,पूर्व जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलंगे,गोपाल कासट,संतोष सोहनी,गोविंद बजाज,भगीरथ चरखा उपस्थित होते.
या सर्वांच्या निवडीबद्दल बाळाप्रसाद भुतडा, तालुकाध्यक्ष उमेश जेथलिया, सचिव रामकीशोर लड्डा,डॉ रामप्रसाद बजाज,विनोद जाजू,राधेश्याम लोहिया,राधेश्याम जेथलिया, रामानंद लड्डा, गणेश भंडारी,डॉ डी जी इंदानी,राजेंद्र इंदानी,संतोष जेथलिया, डॉ कमलकिशोर लड्डा,दिलीपजी रांधड, रविजी मानधने,रमेशजी बाहेती,जगदीश चांडक, लक्ष्मीकांतजी मानधने,डॉ संजयजी जेथलिया, सुनीलजी मालानी, विपीनजी नावदंर, बाळूशेठ सोनी, विवेकजी मुंदडा , विनोदजी बजाज,ओमप्रकाशजी मुंदडा हिवरेकर,राजेंद्रजी करवा, डॉ श्यामसुंदरजी काकानी, उपाध्यक्ष- प्रा प्रवीणजी गिलडा, उपाध्यक्ष-विवेकजी बजाज,सह सचिव- गोपालजी मानधने,कोषाध्यक्ष-नवलजी काबरा,प्रसिद्धी एवं संघटन-गणेशजी लोहिया यांनी अभिनंदन केले.

COMMENTS