Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे

कोपरगाव प्रतिनिधी ः जागतिक योग दिनानिमित्त कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस के जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क

वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून खासदार, आमदारांनी रूग्णसेवेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दयावा – कोल्हे
संगमनेरात परराज्यातील 69 लाखांची दारू जप्त
चोरटा पकडण्याचा सिनेस्टाईल थरार ; अंगलट…तिघांविरुद्ध गुन्हा

कोपरगाव प्रतिनिधी ः जागतिक योग दिनानिमित्त कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस के जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रशिक्षक घाटे व नाईक यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगाचे धडे दिले.
याप्रसंगी बोलतांना प्राचार्य जाधव म्हणाले की, योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी असून जगभरात योगाचे महत्व आपण पोहोचविले ही एक गौरवास्पद बाब आहे. शारीरिक मानसिक आणि भावनिक संतुलनासाठी योगाचे फार महत्व असून योगामुळे मानवी शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होऊन संभाव्य आजारापासून संरक्षण मिळते त्यामुळे प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी योगा करावे असे आवाहन प्राचार्य जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख एस. एम. कुलकर्णी, बी. पी. शिंदे, एस. पी. दिंडोर्डे, एन. व्ही. गायकवाड, आर.आर.चव्हाण, ए. बी. रोहोम, पी. एम. जाधव, एच. त्रही. वानखेडकर, एस. बी. आव्हाड, पी. एन. रायते, ए. डी. भास्कर, वी. टी. घोगरे, यु. व्ही. देवसाळे, आर. वाय. निकम, आर. एस. पानगव्हाणे, के. पी. काटे, एस. एस. भालेराव, पी. एस. पवार, सी. डी. कळणे, ए. बी. गुट्टे, ए. सी. केकाण, आर. डी. आघाव, आर. जि. गोर्डे, एम. एम. लोहाटे, एस. एस. भोईर, आर. आर. नाईकवाडे, पी. जी. डुंबरे, बी. बी. आव्हाड, एन. एच. आव्हाड, एस. एच. तरवडे, के. एस. पाटील, व्ही. आर. लोहारे, के. एच. छजलानी आदींनी विशेष परिश्रम घेतले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS