Homeताज्या बातम्यादेश

अजामीनपात्र वॉरंटनंतर जयाप्रदा कोर्टात दाखल

नवी दिल्ली - प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी रामपूर येथील एमपी एमएलए कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जयाप्रदा यांनी दाखल केलेली र

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने मारले संजय राऊतांच्या फोटोला जोड़े
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी : राजेंद्र यड्रावकर
माथेरानमधील पर्यटन उद्यापासून सुरू

नवी दिल्ली – प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी रामपूर येथील एमपी एमएलए कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जयाप्रदा यांनी दाखल केलेली रिकॉल याचिका स्वीकारण्यात आली आहे. एक दोन नाहीतर, सात वेळा वॉरंट बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहण्याचं कारण जया प्रदा यांनी सांगितलं आहे. एवढंच नाहीतर, त्यांनी तुरुंगात असलेल्या आझम खान यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि पक्त जया प्रदा यांची चर्चा रंगली आहे. कोर्टातून बाहेर आल्यानंतर जया प्रदा म्हणाल्या, ‘मला कोर्टाचे आभार मानायचे आहेत. कोर्टाने मला दिलासा दिला आहे. मी दोनदा रामपूरमधून खासदार राहीली आहे. तुम्ही सर्वांनी मला खासदार होण्याचा दर्जा दिला. जनतेने मला खूप प्रेम दिलं. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त बोलू शकणार नाही.’ पुढे जया प्रदा म्हणाल्या, ‘राजनीती नाही तर, मी लोकांच्या मनात आहे. जनता माझ्या सोबत आहे. जे काही झालं, ते फक्त आणि फक्त माझ्या प्रकृतीमुळे झालं आहे. माझा बीपी हाय झाला होता. शुगर लेवल देखील नियंत्रणात नव्हती. माझ्या कमरेत देखील त्रास होता. किडनी इंफेक्शन होण्याचा धोका होता. त्यामुळे मी डॉक्टरांसोबत फिरत होती. आता देखील माझी प्रकृती ठिक नाही.’ कोर्टाचा मी कायम सन्मान केला आहे. मी कायम तुमच्या सोबत असेल. येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत असेल. जेव्हा निवडणूक होते, तेव्हा मी रामपूरमध्ये असते. कोर्टाला मी पुन्हा सांगेल माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा..’ असं देखील जया प्रदा म्हणाल्या.

COMMENTS