परीक्षांचा सावळा गोंधळ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

परीक्षांचा सावळा गोंधळ

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा जो बोजवारा उडाला तोच बोजवारा, म्हाडाच्या परीक्षांचा उडाला. यावरून राज्य सरकार आणि संबधित यंत्रणा पुन्हा एकदा परीक्षा घेण

कोरोनाचा संसर्ग आणि वाढते निर्बंध
कॅगच्या अहवालातून होणार ठाकरे गटाची कोंडी ?
मनच सर्व गुणांचे उगमस्थान

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा जो बोजवारा उडाला तोच बोजवारा, म्हाडाच्या परीक्षांचा उडाला. यावरून राज्य सरकार आणि संबधित यंत्रणा पुन्हा एकदा परीक्षा घेण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता या परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून पारदर्शक पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. तसेच लोकसेवा आयोगाने देखील परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली असतांना, देखील राज्य सरकारकडून कोणताही निर्णय न घेता, या परीक्षा बोगस यंत्रणेला देऊन पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. म्हाडाच्या परीक्षेला काही तास बाकी असतांना, विद्यार्थी आपल्या परीक्षेस्थळी पोहचले असतांना, मध्यरात्री दीड वाजता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तांत्रिक कारणांमुहे परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे ट्विट केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी, बसच्या संपामुळे खासगी वाहनांनी, पर्यायी सोय करून, पुणे, औरंगाबाद, मुंबईसह विविध शहरात आपल्या परीक्षांच्या स्थळी पोहचले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा परीक्षा स्थगित करून, राज्य सरकारने परीक्षा हा चेष्टेचा विषय चालवला असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांचा ताजा अनुभव असतांना, म्हाडाच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता असतांना देखील त्याच त्या यंत्रणेवर अवलंबून राहत, परीक्षांचा चेष्टेचा विषय चालवल्याचे या भोंगळ कारभारावरून दिसून येत आहे. आरोग्य भरती परीक्षेचा घोळ नवीन असतांनाच, पुन्हा एकदा म्हाडा पेपर फुटीचे धागेदोरे पुण्यात सापडले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. पुण्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकार्‍यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचे पोलीस सांगत आहेत. या मागे मास्टरमाईंढ कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे. वास्तविक पाहता कोरोना परिस्थितीमुळे, गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही जागा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगार तरूणांतून मोठा रोष होता. त्यानंतर आता भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र भ्रष्ट्राचाराच्या या यंत्रणेमुळे पुन्हा एकदा रात्रंदिवस अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्‍न उपस्थित होतांना दिसून येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. मात्र याने प्रश्‍न सुटणार नाही. याप्रकरणी मात्र पोलिसांचे अभिनंदन करावे लागणार आहे. कारण त्यांना या परीक्षेचा पेपर देखील फुटणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यादृष्टीने पुणे सायबर सेल, आरोपींना पकडण्यासाठी योग्य नियेाजन आखून होते. काल रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या संभाषणात पेपरफुटीचा उल्लेख होता. याविषयी बोलतांना आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी व्यवस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत जवळचे आहे त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे, तसेच वशिल्यासाठी काही लोक मंत्रालयात येतात, मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला, असंही ते म्हणाले आहेत. परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार आहे. याच कंपनीने 2 लाख पोलिसांच्या परीक्षा घेतल्या आणि व्यवस्थित पार पडल्या. पण यावेळी पोराच्या आयुष्याचा खेळ झाला असता ते थांबले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच म्हाडा अधिकार्‍यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. या पेपरफुटीने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

COMMENTS