Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंगराळ भागातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड

झाडाखाली ज्ञानार्जन,शिक्षणाधिकार्‍यांना कंदील भेट आंदोलन

बीड प्रतिनिधी- पीएमश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील 13 शाळांची निवड होऊन शासनाच्या निर्देशानुसार या शाळांचा भौतिक विकास करून उपलब्ध सुविधेतुन गुणवत्त

हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत गदारोळ
गौराई समोर साकारला आमदार शहाजी बापूंचा ओक्के मध्ये देखावा.
लॉकडाऊनमुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प !!

बीड प्रतिनिधी- पीएमश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील 13 शाळांची निवड होऊन शासनाच्या निर्देशानुसार या शाळांचा भौतिक विकास करून उपलब्ध सुविधेतुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न स्तुत्य असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा नसल्याने शाळेच्या बांधकामा अभावी कधी पत्र्याच्या शेडमध्ये तर कधी झाडाखाली ज्ञानार्जन करावे लागत असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असुन एकंदरीतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असुन यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.21 सोमवार रोजी बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी शिक्षणाधिका-यांना कंदील भेटआंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त पुणे यांना दिले आहे.
बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानपवस्ती (रूद्रापुर) केंद्र पारगाव (सिरस) डोंगराळ भागात असुन 2002 मध्ये याठिकाणी ग्रामस्थांनी शाळेसाठी जमिन दान देत शाळा अस्तित्वात आली.2014 मध्ये या वस्ती शाळेचे रूपांतर जिल्हा परिषद शाळेत झाले.2017 मध्ये वस्तीवरील सुरेश सानप, कैलास पवार, अशोक चपेट, संजय माळी आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वच्छेने प्रत्येकी 3000 रुपये गोळा करत सिमेंट पोल आणि पत्र्याचे शेड बांधले यासाठी नाथसावली प्रतिष्ठान रूद्रापुर यांनी 10,000 रुपये देणगी दिली होती.सध्या शाळेवर प्रदिप गायकवाड आणि अर्चना सानप दोन शिक्षक आहेत.सध्या पहिली वर्ग 3 मुले 2 मुली दुसरी वर्ग 1 मुलगा 4 मुली तिसरी वर्ग 1 मुलगा 2 मुली चौथी वर्ग 1 मुलगा 3 मुली सध्या 6 मुले आणि 11 मुली एकुण पटसंख्या 17 आहे.परंतु लोखंडी पोल कमजोर झाले असुन शाळेची दुरावस्था व मुलांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी समोर झाडाखालीच शाळा भरवली जाते.वारंवार शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून सुद्धा अद्याप शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नाही केवळ आश्वासनेच मिळत आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 300 खोल्या धोकादायक असल्याने तसेच 772 शाळांना वीजच नाही तर 620 शाळांचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे.एकंदरितच शिक्षण विभागाच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्यच अंधारात असुन यांच्या निषेधार्थ दि.21 सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना कंदिल भेट देण्यात येणार आहे.

COMMENTS