Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छोट्या बहिणींना मदत करण्यासाठी यशदायीनी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा -प्रा.सविता बुरांडे

अंबाजोगाई प्रतिनिधी - प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या छोट्या बहिणींना मदत करण्यासाठी यशदायीनी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन य

पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय
लग्नाचे आमिष दाखवून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी | LOKNews24
क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…

अंबाजोगाई प्रतिनिधी – प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या छोट्या बहिणींना मदत करण्यासाठी यशदायीनी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन यशदायीनी फाऊंडेशनच्या प्रा. सविता बुरांडे यांनी केले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथील सोमेश्वर कन्या विद्यालयात शयदायीनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय गणवेश व साहित्य वाटप कार्यक्रमात प्रा. सविता बुरांडे बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य दि. ना. फड, सोमेश्वर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता जाधव (लोमटे), पत्रकार किरण देशमुख, रंजना करे, रंजना कराड, सिता काबरे यांची उपस्थिती होती.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देताना यशदायीनी प्रतिष्ठान च्या प्रा. सविता बुरांडे यांनी यांनी सांगितले की, सोमेश्वर कन्या विद्यालयात शिक्षण घेवून स्वतः च्या पायावर उभा टाकलेल्या विवाहीत माजी विद्यार्थिनींच्या वतीने यशदायीनी प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली असून मागील पाच वर्षांपासून या प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी शिक्षण घेणार्‍या गरजु मुलींना 40 ते 50 हजार रुपयांचे शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. हे सातत्य यापुढे चालु ठेवण्यासाठी व या उपक्रमात भरीव वाढ व्हावी यासाठी या शाळेतुन शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य दि.ना. फड यांनी यशदायीनी फाऊंडेशन चार हा उपक्रम मराठवाडा शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणारा एकमेव उपक्रम आहे. माजी विद्यार्थिनींनी आजी विद्यार्थिनींच्या मदतीसाठी उचललेले पाऊल हे मराठवाड्यातील माजी विद्यार्थिनी नशा दिशादर्शक ठरणारा उपक्रम आहे. या उपक्रमाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे ही दि.ना. फड यांनी सांगून या प्रतिष्ठान च्या पदाधिकार्‍यांचा गौरव केला. या कार्यक्रमात पत्रकार किरण देशमुख, रंजना कराड, रंजना करे, सिता काबरे यांची भाषणं झाली.  मुख्याध्यापिक सौ. सविता जाधव यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर, संगेवार सर, नखाते, देशमुख, जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS