Homeताज्या बातम्या

जिल्ह्यात पीएम राहत योजना प्रभावीपणे राबवा: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड: देशातील रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारची पीएम राहत योजना ही कॅशलेस उपचार योजना असून अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेअंतर्

उत्तरप्रदेशातील अपघातात 10 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

बीड: देशातील रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारची पीएम राहत योजना ही कॅशलेस उपचार योजना असून अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यास तातडीने मोफत उपचार मिळतात. तरी रस्ते अपघातातील गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारची पीएम राहत योजना अत्यंत महत्त्वाची असून आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने परस्परांमध्ये समन्वय ठेवून ती जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीएम राहत योजनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता यांच्यासह पोलीस, आरोग्य व संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पैशाअभावी उपचार थांबू नयेत, म्हणून सरकारने ही कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. यामध्ये कोणत्याही कागदपत्रांची किंवा आगाऊ पैशांची वाट न पाहता डॉक्टर त्वरित उपचार सुरू करतात. ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरणारी आहे. त्यामुळे तिची अंमलबजावणी अत्यंत चोखपणे व्हावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी दिले.

COMMENTS