Homeताज्या बातम्या

राज्यातील वाघांची संख्या सहाशेपार?

नागपूऱ / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे संकेत 2026 च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांतून मिळाल

अवैध रेती वाहतुकीवर भाग्यनगर पोलिसांची कारवाई; टिप्परसह 5.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली
प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!
Bengal tiger - Wikipedia

नागपूऱ / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे संकेत 2026 च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांतून मिळाले आहेत. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील वाघांची संख्या 600 ते 625 दरम्यान पोहोचली आहे. अंतिम अहवाल जुलै 2027 मध्ये प्रसिध्द होणार आहे. या प्राथमिक आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला बळ मिळाल्याचे चित्र आहे.सन 2022च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेत महाराष्ट्रात 444 वाघांची नोंद झाली होती. त्यानंतर चार वर्षांत अनेक व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्रांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे यंदाच्या गणनेत दिसून आले. विशेषत: मेळघाट, गडचिरोली, ब्रह्मपुरी, उमरेड-कर्‍हाडला आणि नवेगाव-नागझिरा या भागांत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 2022 मध्ये सुमारे 50 ते 60 वाघ होते. यंदा ही संख्या 90 ते 100 पर्यंत पोहोचल्याचा अंदाज

COMMENTS