शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित; हरियाणा, यूपी, पंजाब, बिहार, कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर आंदोलन

Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित; हरियाणा, यूपी, पंजाब, बिहार, कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर आंदोलन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायद्याच्या विरोधात आणि लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी सकाळी 10 ते 6 या व

डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बार्टीतर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न
विषारी दारुचे बळी
आसारामचा बापूचा तुरुंगात डान्स! व्हिडीओ व्हायरल | LOKNews24

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायद्याच्या विरोधात आणि लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी सकाळी 10 ते 6 या वेळेत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. रेल्वे रूळांवर झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित होऊन प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
लखीमपूर खीरीमध्ये घडलेली हिंसक घटना विस्मरणात जाऊ शकत नाही. आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं आज शेतकर्‍यांनी सहा तासांचा रेल्वे बंद पुकारला आहे. यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील, असे ट्विट किसान एकता मोर्चाने केले. दरम्यान, रेल रोकोच्या पार्श्‍वभूमीवर लखनऊ जिल्ह्यात कलम 144 ची घोषणा पोलिसांनी केली. रेल रोकोमध्ये सहभागी होणार्‍यांविरोधात पोलीस कारवाई करतील. तसेच कुणीही सामान्य परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्यात येईल, असेही लखनऊ पोलिसांनी म्हटले आहे.
अजय मिश्रा यांच्या मुलावर लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप आहे.लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत न्याय सुनिश्‍चित करण्यासाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून अजय मिश्रा टेनी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली. मोर्चाने लखीमपूर प्रकरणाला नरसंहार म्हटले आहे. अमृतसरमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवरच आंदोलन करत आहेत. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे, रोहतक, पानिपत, सोनीपत, कुरुक्षेत्र, कैथल, बहादूरगढ, अंबाला, जालंधर, लुधियाना, चंदीगड, अमृतसर, जम्मू, मेरठ, गाझियाबाद, शामली, सहारनपूर, मुरादाबाद यासह काही जवळच्या विभागांवर रेल्वे वाहतुकीवर अधिक परिणाम झाला आहे. यापूर्वीही शेतकर्‍यांनी या मार्गांवर वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक अडवले आहेत. हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे रोखण्यात आल्याचे वृत्त आहे. या निदर्शनाचा जास्त प्रभाव उत्तर प्रदेशातील पश्‍चिम जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी मुझफ्फरनगरमधील रेल्वे ट्रॅक अडवला आहे. गाझियाबादमध्येही शेतकर्‍यांनी गाड्या थांबवल्या आहेत. मात्र, बुलंदशहरमधील हरपाल गटाने रेल्वे रोको आंदोलन मागे घेतले आहे. शेतकरी आंदोलन पाहता रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकवर फोर्स तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आंदोलन पाहता 44 तुकड्या पीएसी आणि 4 तुकड्या पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. पश्‍चिम आयपीच्या 14 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ आयपीएसची तैनाती आधीच सुरू आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडातील शहीदांच्या अस्थीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये शहीद कलश यात्रा काढल्या जात असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली. यात मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत. शेतकरी नेत्यांनी इशारा दिला आहे की, रेल रोको आंदोलनानंतरही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

COMMENTS