Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकलची चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच धाव

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील अप दिशेकडे येणारी लोकल मंगळवारी सकाळी चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच धावली. परिणामी, मुंबई सेंट्रलला प्रचंड गर्दी झा

जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नगर सातपूर या ठिकाणी सुरू असलेल्या अमरण उपोषणाची सांगता
विधानसभा निवडणूक लढणार ः चंद्रकांत खैरे

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील अप दिशेकडे येणारी लोकल मंगळवारी सकाळी चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच धावली. परिणामी, मुंबई सेंट्रलला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे चर्चगेटला जाणार्‍या प्रवाशांना कार्यालय गाठण्यासाठी द्राविडी प्राणायाम घडला. काही प्रवाशांनी मुंबई सेंट्रलवरून पायपीट करीत चर्चगेट गाठले.
चर्चगेट स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी 8.50 च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप दिशेकडे येणारी लोकल सेवा खोळंबली. लोकलगाड्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येत होत्या. यामुळे ग्रॅन्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स आणि चर्चगेटला जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सिग्नल बिघाड झाल्यामुळे, घटनास्थळी पश्‍चिम रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी 9.22 वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणेतील बिघाडाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र त्यानंतरही लोकल सेवा विलंबाने धावत होती. यामुळे अनेकांना कार्यालयात जाण्यात खूप उशीर झाला.

COMMENTS