Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखर उत्पादनात राज्याने गाठला 50 लाख टनाचा टप्पा

197 कारखान्यांची गाळप आणि उत्पादनात सरस कामगिरी

पुणे/प्रतिनिधी ः साखर उत्पादनात देशाने ब्राझीलला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली असतांनाच, यंदा देखील साखरेचे उत्पादन विक्रमी होत असल्याचे दिसून

सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
तिसर्‍या पर्यायाच्या शोधात !
सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

पुणे/प्रतिनिधी ः साखर उत्पादनात देशाने ब्राझीलला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली असतांनाच, यंदा देखील साखरेचे उत्पादन विक्रमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या 197 कारखान्यात गाळप आणि साखर उत्पादन सुरु असून, या कारखान्यांनी 50 लाख टन साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे.

पुण्यातील साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार  4 जानेवारीअखेर 100 सहकारी आणि 97 खासगी, अशा 197 साखर कारखान्यांनी 536.78 लाख टन उसाचे गाळप करून पन्नास लाख टन (505.64 लाख क्विंटल) साखरेचे उत्पादन केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे यंदा देखील गाळप हंगाम संपण्यापूर्वी राज्यात साखर उत्पादन विक्रमी होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. यंदा दसरा, दिवाळी आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे गळीत हंगाम सुरु होण्यास उशीर सुरू झाला होता. सुरुवातीच्या महिन्याभरात गाळप हंगाम संथ गतीने सुरू होता. तसेच कामगांची वाणवा या सर्वंच बाबींमुळे साखर उत्पादन कमी होते की, काय अशी शंका उपस्थित होत होती. मात्र आता हंगामाने गती घेतली आहे. मागील हंगामाची तुलना करता मागील वर्षी याच दिवशी 96 सहकारी, 95 खासगी, असे 191 कारखाने सुरू होते, त्यांनी 508.27 लाख टन उसाचे गाळप करून 49 लाख टन (495.44 लाख क्विंटल) साखर उत्पादन केले होते. यंदा 100 सहकारी आणि 97 खासगी, असे 197 कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी 536.78 लाख टन उसाचे गाळप करून 505.64 लाख क्विंटल म्हणजे पन्नास लाख टन साखरेचे उत्पन्न घेतले आहे.कोल्हापूर साखर विभागाची गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी कायम आहे. कोल्हापूर विभागाने 124.48 लाख टन उसाचे गाळप करून तेरा लाख टन (135.36 लाख क्विंटल) साखरेचे उत्पन्न घेतले आहे. त्या खालोखाल पुणे सोलापूर विभागाचा क्रमांक लागतो. नागपूर विभाग सर्वात पिछाडीवर असून, केवळ चार खासगी कारखाने सुरू आहेत. त्यांनी 2.12 लाख टन उसाचे गाळप करून 1.71 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे.

दररोजची गाळप क्षमता साडेआठ टनांवर ः शेखर गायकवाड
राज्यात यंदा गाळपाचा वेग जास्त आहे. त्यामुळे राज्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता साडेआठ लाख टनांवर गेल्याची माहिती साखर आयुक्त साखर गायकवाड यांनी दिली आहे. तसेच यंदाचा हंगाम एप्रिलअखेर संपेल. या पुढेही कधीही मे महिन्यापर्यंत गाळप करावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण झाली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

COMMENTS