भारतीय विद्यार्थी शेखरप्पा नवीनचा युक्रेनमध्ये मृत्यू

Homeताज्या बातम्या

भारतीय विद्यार्थी शेखरप्पा नवीनचा युक्रेनमध्ये मृत्यू

कीव्ह/वृत्तसंस्था : रशिया-युक्रेनमधील हे युद्ध आणखी स्फोटक वळणावर आले आहे. कारण यात आता एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भा

जय श्री राम’ला विद्यार्थीनीचं अल्ला हूँ अकबरनं प्रत्युत्तर!
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : मुख्यमंत्री फडणवीस
अस्मानी संकट

कीव्ह/वृत्तसंस्था : रशिया-युक्रेनमधील हे युद्ध आणखी स्फोटक वळणावर आले आहे. कारण यात आता एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे.तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. किराणा विकत घ्यायला नवीन बाहेर होता आणि त्याच वेळी तिकडे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला आणि त्यात नवीनच मृत्यू झाला.

COMMENTS