Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहेश्वरी क्रिकेट प्रीमियम लीग यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

राजस्थानी समाजाच्या 90 युवकांचा सहभाग

अंबाजोगाई प्रतिनिधी - माहेश्वरी क्रिकेट प्रीमियम लीग यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यां

हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN

अंबाजोगाई प्रतिनिधी – माहेश्वरी क्रिकेट प्रीमियम लीग यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांचे हस्ते शुक्रवारी संपन्न झाले.या स्पर्धेत राजस्थानी समाजाच्या एकूण 90 युवक सहभागी झाले आहेत.
यावेळी क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख आतिथी म्हणुन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काका लोमटे ,बीड जिल्हा माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष अड.श्रीकृष्ण तोष्णीवाल होते. तर विशेष अतिथी म्हणून जगदिश जाजु ,रामनिवास भन्साळी , दत्तप्रसाद लोहिया , सतिश तोष्णीवाल ,रोहन मुंदडा , नितीश लोहिया आदी उपस्थित होते. तर व्यासपीठावर वैजनाथ देशमुख,निशिकांत पाचेगावकर,संदीप पारीख ,श्रीकांत मुंदडा, सुरज बजाज, शुभम लखेरा ,अभिमन्यु वैष्णव व संजय सुराणा यांची उपस्थिती होती. माहेश्वरी प्रीमीअर लीग स्पर्धा दि.21 ते 23 एप्रिल दरम्यान होत आहे .या मध्ये टिव्हीएस पँथर्स ,मुंदडा किंगज , केकीज इंडीयन , लखेरा वारीअर्स, वैष्णव सनरायजर्स ,सुराणा सुपरकींग हे सहा संघ खेळत आहेत . माहेश्वरी युवा संघटना कडुन एम.पी.एल.चे हे 11 वे वर्ष असुन या होऊ घातलेल्या स्पर्धेत राजस्थानी समाजाचे 90 खेळाडु मैदानावर उतरले आहेत .हि नवयुवकासाठी नक्कीच प्रेरणादाई आहे. उद्धघाटन समारंभाची सुरवात भगवान श्री  महेशाचे पुजन करुन झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तापडे यानी केले.सामन्याचे पंच म्हणुन अमोल गोचडे व धम्मा जाधव म्हणुन काम पहात आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंबाजोगाई येथिल युवा माहेश्वरी संघटनेचे सदस्य परीश्रम घेत आहेत.

COMMENTS