Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे

फलटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण बस स्थानकावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून, चिखल व घाणीचे साम्राज्य निर्

शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा; गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस विभागाला सूचना
ग्रामीण भागाचा विकास झाल्यास जिल्ह्यासह राज्याचा विकास : ना. शंभूराज देसाई
कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार

फलटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण बस स्थानकावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून, चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना त्यातून वाट काढून बसमध्ये प्रवेश करावा लागत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. दरम्यान जून महिन्यातील पहिल्या पावसाने बसस्थानकाचे रुपडे बदलले असून जणू काही तळेच आहे, असे वाटू लागले होेते.
फलटण बस स्थानक दुरुस्ती व बस स्थानकातील खुल्या जागेचे सिमेंट काँक्रिटीकरण गेल्या 2 वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. वास्तविक, संपकाळात बस बंद असताना सदर काम पूर्ण करून घेता आले असते, त्यावेळी ते केले गेले नाही, आता पावसाळा सुरू झाला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. विद्यार्थी शहरात येत आहेत, शेतीचे हंगाम असल्याने शेतकरी बी-बियाणे, खते, औजारे खरेदीसाठी येत आहेत, विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश, वह्या, पुस्तके, शालेय गणवेश खरेदीसाठी पालक तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. पावसाळी वातावरणामुळे वृध्दांच्या प्रकृतीमध्ये होणार्‍या बदलांच्या पार्श्‍वभूमीवर ते एसटी बसचा आधार घेत तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने बस स्थानकावर सर्व वयोगटातील आणि विविध समाजघटकातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
बस स्थानकावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली आहे. बसमध्ये चढ-उतार करताना विशेषत: महिला, वृध्द, लहान मुलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. चिखल व साठलेल्या पाण्यात पडल्याने त्यांना दुखापत होण्याचा धोका असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

COMMENTS