Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागाचा विकास झाल्यास जिल्ह्यासह राज्याचा विकास : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी क

सोने तारण कर्जात बँक ऑफ इंडियाला लावला चुना
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध

सातारा / प्रतिनिधी : खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी सुनील गाडे, गट विकास अधिकारी शेलार, कार्यकारी अभियंता व्ही. शिंदे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, गावातील रस्ते, साकव, संरक्षण भिंती अशा विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. डोंगरात वसलेल्या गावांपर्यंत विकास पोहचत आहे. ग्रामीण जनतेपर्यंत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सोयी पुरवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

येत्या तीन दिवसात 58 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होत असल्याचे सांगून देसाई पुढे म्हणाले, विकासाचे एक रोल मॉडेल म्हणून पाटण तालुक्याचा विकास करू या. त्यासाठी नागरिक माझ्यासोबत राहतील आणि साथ देतील, असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदेवाडी, कुसरुंड, सुळेवाडी, पाटील वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS