Homeताज्या बातम्यासंपादकीय

ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 

मणिपूर प्रश्नावर आज देशात जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, तिचे पडसाद देशाच्या संसदेपासून तर सामान्य माणसांपर्यंत उद्विग्न  अशापरिस्थितीत दिसून येत

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा निवडणूक स्टंट !
आतून काँग्रेस कशी पोखरली ?
सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?

मणिपूर प्रश्नावर आज देशात जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, तिचे पडसाद देशाच्या संसदेपासून तर सामान्य माणसांपर्यंत उद्विग्न  अशापरिस्थितीत दिसून येत आहेत. खरेतर मणिपूरमध्ये गेल्या ४ मे पासून हिंसाचाराचा जो आगडोंब उसळला आहे, त्याचा दोष नेमका कुणावर द्यावा, असा प्रश्न जर उपस्थित झाला तर, निश्चितपणे यंत्रणांच्या माथ्यावरही हा दोष जाईलच! मणिपूरच्या राज्यपाल असणाऱ्या अनुसुईया उईके यादेखील आदिवासी समाजाच्या आहेत. परंतु, त्यांनी देखील तीन महिने सुरू असलेल्या हिंसाचारावर कोणताही अहवाल, केंद्र सरकारकडे पाठवला नाही. जर तसा अहवाल पाठवला असेल तर, केंद्र सरकारने मणिपूर सरकारला बरखास्त न करण्याचं नेमकं कारण मग काय?  हा प्रश्न अनुषंगिकपणे उभा राहतो. राज्यपाल यांनी आता प्रसार माध्यमांना मुलाखत देण्याची प्रक्रिया सुरू केली. या गोष्टीला खूप उशीर झाला आहे. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने दोन महिलांची विवस्त्र काढण्यात आली, त्यावर जगभरातून निषेध होत आहे. त्यावर अमेरिकन संसदेतही चर्चा होत आहे. देशामध्ये या महिलांच्या प्रश्नावर, प्रत्येक देशवासीयाच्या मनात चीड निर्माण झाली आहे. मणिपुर मध्ये मैतेई आणि कुकि या दोन समाजात होणारा संघर्ष, हा यापूर्वी का झाला नाही? असा जर आपण प्रश्न उभा केला तर, नेमकी याची पाळेमुळे कुठे आहेत, हा प्रश्न देखील उभा राहतो. कुठल्याही परिस्थितीला, घटनेला कार्यकारण भाव असतो. त्या कार्यकारण भावातच त्याची कारणे दडलेली असतात. मैतेई समाज हा मणिपूरच्या सत्ताधारी वर्गापैकी आहे. म्हणजे तेथील विधानमंडळामध्ये त्यांचे सदस्यत्व हे किमान 75 टक्के आहे. तर आदिवासी समुदाय हा अनुसूचित क्षेत्र म्हणून त्याला मिळत असलेल्या सुविधांचा उपयोग करित आहे. तरीही, एवढी असूया मैतेई समाजात का निर्माण झाली? जी घटना मणिपूरमध्ये घडली, याविषयी सामाजिक पातळीवर अनेक विचारवंतांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा प्रकारच्या घटना कोणत्या व्यवस्थेत घडत होत्या, याची थेट मांडणी केली आहे. परंतु, आम्ही इतिहासात न जाता आजच्या मूल्य व्यवस्थेत या प्रश्नाची चर्चा करणार. कारण, जगातला सर्व समाज आधुनिक होत असताना आणि आपल्यासमोर युरोप आणि अमेरिकन देशाची विकासाची आदर्श रचना उभी असताना, त्या देशांमध्ये मानवी जीवनाचे मूल्य आणि स्त्रीचा सन्मान, या गोष्टीचा प्रभाव आहे. समाज व्यवस्थेच्या आहेत, त्याच गोष्टी आपल्या भारतीय संविधानांनी अधोरेखित केल्या आहेत. ज्यावेळी युरोपचा विकास झालेला नव्हता किंवा युरोपीय देश विकसित देशांच्या श्रेणीत नव्हते, अशा सत्तर वर्षांपूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या संविधानाने या बाबी अधोरेखित केल्या आहेत. परंतु, आज आम्ही ही सगळे मूल्य पायदळी तुडवत आहोत का? की केवळ सत्तेच्या अधाशीपणातून, असे म्हणण्या वाचून पर्याय राहिला नाही. ज्या प्रकारे मणिपूरचा व्हिडिओ समाज माध्यमांतून प्रसारित होत आहे, त्यामुळे प्रत्येक मन हे व्यथित झाले आहे.  त्या प्रत्येक मनासमोर एक प्रश्न उठणार आहे की, उद्याची येणारी व्यवस्था किंवा येणारी सत्ता, अशी व्यवस्था प्रशस्त करणार आहे काय? हा प्रश्न सहाजिकच मनामनात उभा राहिला. मणिपूरचा हिंसाचार किंवा मणिपूरमध्ये घडलेली विवस्त्रदिंड ही बाब एवढ्या पुरती मर्यादित नाही तर ज्या तरुण पिढीने हा व्हिडिओ बघितला आहे जे सामाजिक विचारांपासून कोशू दूर असतात ती १८-२० वर्षाची पिढी देखील हे व्हिडिओ पाहून व्यथित झाले आहेत. येणारा उद्या काय असा आहे, हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे मणिपूरचा प्रश्न हा केवळ तात्कालीक नाही. या देशाच्या एकूण समाजमनावर जे प्रश्नचिन्ह तो उभे करीत आहे, तो दीर्घकाळ परिणाम करणारा विषय ठरणार आहे.

COMMENTS