Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांच्या पुढे

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ करण्या

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर इराण टोल आकारणार; इराणच्या संसदेत मंजुरी; पश्‍चिम आशियात तणावाची नवी ठिणगी
अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा
पेट्रोकेमिकल क्षेत्राला दिलासा; 40 उत्पादनांवरील सीमा शुल्क माफ

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत झालेली ही दुसरी मोठी दरवाढ असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन दरांनुसार, डिझेलची किंमत प्रति लिटर सुमारे 520 रुपयांच्या पुढे गेली असून पेट्रोलचे दरही 458 रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक स्तरावर तेल दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई तीव्र करण्याचे संकेत दिल्यानंतर तेल दरांनी मोठी उसळी घेतली. अमेरिकन तेलाच्या किमतींमध्ये दहा टक्क्यांहून अधिक, तर ब्रेंट प्रकारातील तेलाच्या दरात सात टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी वित्त मंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्‍चिततेमुळे इंधन दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. आयात-आधारित अर्थव्यवस्थेमुळे जागतिक दरवाढीचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही गेल्या महिन्यात पाकिस्तानने इंधन दरात सुमारे वीस टक्के वाढ केली होती.

COMMENTS