Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केलवडमध्ये आजही जपली जातेय शेकडो वर्षांची परंपरा; सर्वच ग्रामस्थ होतात सहभागी

हातात झाडू..स्मशानातील सुप..अन ग्रामस्थांना मारणारा डसन डुक्कर.. राहाता : आधुनिकतेच्या धावत्या युगातही काही गावे आपल्या परंपरा जपताना दिसतात.

पतसंस्था म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ : डॉ.जयश्री थोरात
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात

हातात झाडू..स्मशानातील सुप..अन ग्रामस्थांना मारणारा डसन डुक्कर..

राहाता : आधुनिकतेच्या धावत्या युगातही काही गावे आपल्या परंपरा जपताना दिसतात. राहाता तालुक्यातील केलवड हे असेच एक गाव. येथे धुलीवंदनाच्या दिवशी ‘डसन डुक्कर’ म्हणून ओळखली जाणारी आगळीवेगळी प्रथा आजही उत्साहात साजरी केली जाते. हातात झाडू, स्मशानातील सुप आणि डसन डुक्कराचे सोंग… सुमारे अडीच ते तीन हजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत तासभर रंगणारा हा सोहळा गावाच्या सांस्कृतिक परंपरेची साक्ष देतो.

 गावकऱ्यांच्या माहितीनुसार ही प्रथा चार-पाच पिढ्यांपासून सुरू आहे; मात्र तिची नेमकी सुरुवात कधी झाली याबाबत ठोस माहिती कोणालाही देता येत नाही. धुलीवंदनाच्या दिवशी डसन डुक्कराचा वेश परिधान केलेला व्यक्ती मारुती मंदिरासमोरील होळीचे दर्शन घेतो. होळीची राख कपाळाला लावून हातात झाडू व स्मशानातील सुप घेऊन समोरच्या व्यक्तीला हलकासा मार दिला जातो. या मारामुळे वर्ष चांगले जाते, संकटे दूर होतात, असा समज ग्रामस्थांमध्ये आहे.

या वेळी डसन डुक्कराचे सोंग गावातीलच व्यक्ती वठवतात. ढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा रंगतो. झाडू-सुपाचा मार घेताना ग्रामस्थांमध्ये हास्य-विनोदाची धमाल उडते. या परंपरेतून प्रतीकात्मकरीत्या दहा-वीस रुपये गोळा करण्याचीही प्रथा आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्याचे गावकऱ्यांना विशेष आकर्षण असते. केलवडमधील परगावी दिलेल्या मुली या दिवशी माहेरी येतात, तर नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले युवकही या उत्सवासाठी गावी परततात. सायंकाळी सुमारे पाच ते साडेसहा या वेळेत हा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर ग्रामस्थ टिपरीचा खेळ खेळून उत्सवाला आणखी रंगत आणतात.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी नरेश राऊत फाउंडेशनचे लक्ष्मण गोर्ड यांनी ११ हजार रुपयांची देणगी दिली. आधुनिकतेसोबतच पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपण्याची भावना केलवडकरांनी या सोहळ्यातून जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS