Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत लोकलमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म

मुंबई ः लोकलमधून प्रवास करताना एका महिलेले बाळाला जन्म दिला आहे. या महिलेच्या प्रसूतीदरम्यान एका सहप्रवासी वृद्ध महिलेने कोणत्याही वैद्यकीय साहित

लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान!
मालदीवमध्ये इस्रायली नागरिकांच्या प्रवेशावर बंदी
आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड

मुंबई ः लोकलमधून प्रवास करताना एका महिलेले बाळाला जन्म दिला आहे. या महिलेच्या प्रसूतीदरम्यान एका सहप्रवासी वृद्ध महिलेने कोणत्याही वैद्यकीय साहित्याशिवाय संबंधित महिलेची मदत केली. वृद्ध महिलेच्या मुलीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून याची माहिती दिली. मुंबई लोकलमध्ये महिलेने बाळाला जन्म दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धनश्री उल्हासराजे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, आज सकाळी माझ्या आईने लोकमधून प्रवास करताना एका गर्भवती महिलेला कोणत्याही वैद्यकीय साहित्य नसताना बाळाला जन्म देण्यास मदत केली. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. आई मला तुझा अभिमान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती महिला नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जात होती. कोणत्याही वैद्यकीय साहित्य नसताना बाळाला जन्म देण्यास मदत करणे आव्हानात्मक होते. परंतु, सुखरुप प्रसूती करण्यासाठी वृद्ध महिलेने प्रचंड धैर्य आणि काळजी दाखवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच या प्रसूती करणार्‍या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एका वापरकर्त्याने आपल्या प्रतिक्रियेमध्ये असे म्हटले आहे की, आई ही आईच असते!. दुसर्‍या वापरकर्त्याने मला नारी शक्तीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS