बीड : दरोडा टाकून गंभीर मारहाण केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करत महत्त्वप

बीड : दरोडा टाकून गंभीर मारहाण केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड.आदित्य अॅए. राख यांनी केलेला प्रभावी व सखोल युक्तिवाद निर्णायक ठरल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी यांनी उमेश भोसले व इतर चार जणांविरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दि. 30 जुलै 2024 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून दरोडा टाकला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईप व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच घरातील सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचेही नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम 309(6) व 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले. मात्र, सादर पुराव्यातील त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे न्यायालयाने गंभीरपणे विचारात घेतले. अॅड. आदित्य ए. राख यांनी सखोल कायदेशीर अभ्यासाच्या आधारे केलेल्या युक्तिवादात, सरकार पक्ष आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, उपलब्ध पुरावे व संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. आदित्य अॅए. राख यांना ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रवीण राख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अॅड. जे. एल. पठाण, अॅड. एम. अॅए. तांबोळी, अॅड. आर. एस. कोरडे, अॅड. डी. व्ही. जाधव, अॅड. पालवे आणि अॅड. शलभ राख यांनीही सहकार्य केले.

COMMENTS