Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम स्कूलच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज

कोपरगाव प्रतिनिधी : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तर

शनिश्‍वर देवस्थानच्या पंढरपूर मठात प्रतिमा भेट
संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा
कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता

कोपरगाव प्रतिनिधी : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धांमध्ये केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर 12 ते 22 ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीकडे कूच केल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
गौतम पब्लिक स्कूलने क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. गौतमच्या विजयी सब-ज्युनिअर हॉकी संघाने दिनांक 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान पुणे बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया केली आहे. गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम असून आजतागायत गौतमचा हॉकी संघ दहाव्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे. दिल्ली येथील शिवाजी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडणार्‍या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतमचा विजयी संघ महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्र नेहरू हॉकी तथा गौतम पब्लिक स्कुलच्या सब-ज्युनियर हॉकी संघात मंथन देवरे (कर्णधार), शोएब शेख (उप-कर्णधार), महेश गायके (गोलकीपर), सुरज पाटील, श्रेयस तासकर, रोनक पाटील, संकेत गायकवाड, सोहम खिरीद, विपुल साळुंके, आयुष मोगल, ओम क्षीरसागर, श्‍लोक महागावकर, द्रोण अहिरे, समर्थ पवार व ओम मुरडणर आदी खेळाडूंचा समावेश आहे. गौतमच्या हॉकी खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत असून राष्ट्रीय स्पर्धेस दिल्ली येथे रवाना होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्थचे विश्‍वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे. सर्व संस्था सदस्य, प्राचार्य नूर शेख, पालक आदींनी सर्व खेळाडूंना विजयी अभियान अबाधित ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौतमच्या हॉकी संघाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन होवून गौतम पब्लिक स्कूलचा मैदानावरचा दबदबा कायम राहावा यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, क्रीडा संचालक सुधाकर निलक, सर्व क्रीडा प्रशिक्षक, सर्व हाउस मास्टर्स यांनी मेहेनत घेतली आहे.

COMMENTS