Homeताज्या बातम्या

केज शहरातील भवानी चौकात भीषण अपघात! हायवा टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

केज: केज शहरात अपघातांची मालिका सुरूच असून भवानी चौकात गुरुवारी सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. डस्टने भर

राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूलच्या तीन खेळाडूंची निवड; बीडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘अभाविप’तर्फे शिक्षकांचा सन्मान; अहिल्यानगरमधील ३०० हून अधिक प्राध्यापकांना शुभेच्छा
पालवन शिवारात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या? बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू
Chhattisgarh: Two killed after driver loses control, rams car into tree in  Durg

केज: केज शहरात अपघातांची मालिका सुरूच असून भवानी चौकात गुरुवारी सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. डस्टने भरलेल्या हायवा टिप्परने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याने या अपघातात तरुणाचा जागीच करुण अंत झाला. अपघाताचे दृश्य एवढे भयानक होते की घटनास्थळी पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यासह तांबवा गावावर शोककळा पसरली आहे.

नितीन आदिनाथ चाटे (वय ३५ वर्ष, रा. तांबवा, ता. केज) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी नितीन हे आपल्या दुचाकीवरून केज शहरातील भवानी चौकातून जात असताना वेगात आलेल्या डस्टने भरलेल्या हायवा टिप्परने त्यांना जोरदार धडक देऊन चाकाखाली चिरडले. या अपघातात नितीन चाटे यांच्या शरीराचा अक्षराशः चेंदामेंदा झाला. शरीराचे तुकडे वेगळे होऊन रक्त आणि मांसाचा चिखल साचल्याने परिसर हादरून गेला होता. वैद्यकीय प्रक्रियेसाठी अवयव गोळा करून रुग्णवाहिकेतून न्यावे लागले.

या घटनेची माहिती शहरात पसरताच सर्व स्तरातून तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. केज शहरात दररोज घडणाऱ्या अशा अपघातांना चौकाचौकांतील अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते, नियमित वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांचा अभाव, अवैध प्रवासी वाहतूक आणि आवश्यक ठिकाणी गतिरोधक नसणे या गोष्टी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, केज पोलीस या भीषण अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS