Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिन्नर तालुक्यात स्कॉर्पिओचा भीषण अपघात

२ ठार ३ गंभीर

नाशिक : समृध्दी महामार्गावर अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृ

अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन
तळेगाव ढमढेरेजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, 9 जवान शहीद 1 जखमी

नाशिक : समृध्दी महामार्गावर अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर सकाळी भीषण अपघात घडला. सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे या अपघातात जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी झाल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली आणि हा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात घडला तेव्हा मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

COMMENTS