नगर अर्बनच्या नव्या संचालकांना दणका…रिझर्व्हने लादले निर्बंध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनच्या नव्या संचालकांना दणका…रिझर्व्हने लादले निर्बंध

ठेवी घेण्यास व कर्ज देण्यास मनाई, 10 हजारापर्यंतच पैसे देता येणार

अहमदनगर/प्रतिनिधी : अवघ्या सहा दिवसांपूर्वी अधिकारारुढ झालेल्या नगर अर्बन बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या नव्या संचालक मंडळाला सत्तेची चव चाखण्याआध

शेतकर्‍यांची ससेहोलपट कधी थांबेल ?
पाणीटंचाईचे संकट
समान नागरी कायद्याची चाचपणी

अहमदनगर/प्रतिनिधी : अवघ्या सहा दिवसांपूर्वी अधिकारारुढ झालेल्या नगर अर्बन बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या नव्या संचालक मंडळाला सत्तेची चव चाखण्याआधीच रिझर्व्ह बँकेने जोरदार दणका दिला आहे. बँकेला सहा डिसेंबरपासून कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही, जुन्या कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही, नव्या ठेवी स्वीकारता येणार नाही वा बँकेची कोणतीही जुनी देणी देता येणार नाहीत वा मालमत्ताही विकता येणार नाही, अशा नव्या निर्बंधांसह चालू वा बचत खात्यांतून वा ठेवींच्या रकमेपैकी फक्त 10 हजाराची रक्कमच संबंधितांना अदा करता येणार आहे. शिवाय बँकेचा कारभार करताना कोणताही निर्णय रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीनेच घ्यावा लागणार आहे. दरम्यान, बँकेचे नवे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांच्याशी याबाबत संपर्क साधल्यावर त्यांनी, प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला नाही, पण रिझर्व्ह बँकेची ती आठ पानांची ऑर्डर असून, तिचा अभ्यास करून मी बोलतो, असे ते म्हणाले.
मागील 2014 ते 2019चे संचालक मंडळ बरखास्त करून रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर प्रशासक नेमला होता. त्याचा सव्वा दोन वर्षांचा काळ संपण्याआधीच केंद्रीय सहकार निबंधकांनी राज्य सहकार प्राधिकरणाच्या मदतीने नगर अर्बन बँकेची नुकतीच निवडणूक घेतली. मागील बरखास्त केलेल्या सहकार मंडळातील जुने सात सदस्य व नवे 11 सदस्य असलेल्या सहकार मंडळानेच आता पुन्हा सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीतून बँक बचाव कृती समिती बाहेर पडल्याने सहकार मंडळाने एकहाती सत्ता काबीज केली व ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत सत्तेची दालने ताब्यात घेतली. पण ती घेऊन सहा दिवस होत नाही तोच रिझर्व्ह बँकेने सोमवारी (6 डिसेंबर) सायंकाळी जोरदार दणका दिला व नवे निर्बंध बँकेच्या कारभारावर लादले. त्यामुळे आता नव्या संचालक मंडळाला नवीन कर्ज वितरण वा ठेवी स्वीकारता येणार नाही व फक्त बँकेची थकीत कर्जाची वसुलीच करणे भाग पडणार आहे.

काय आहेत रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
-कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही व कोणत्याही जुन्या कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही.
-नवीन ठेवी घेऊ शकणार नाही.
-कोणतेही जुने वा नवे देणे देता येणार नाही.
-कोणतेही व्यावसायिक वा अन्य करार करता येणार नाहीत.
-बँकेच्या कोणत्याही संपत्तीची विक्री वा हस्तांतरण करता येणार नाही.
-बचत वा चालू खात्यातून कोणत्याही खात्यात वा कॅश स्वरुपात 10 हजार रुपये काढण्याची मर्यादा. बँकेत असलेल्या ठेवींवरही अशीच 10 हजारापर्यंत रक्कम काढता येण्याची मर्यादा.

सहा महिन्यांसाठी निर्बंध
रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध म्हणजे नगर अर्बन बँकेचे बँकींग लायसन्स रद्द केल्याचा अर्थ कोणीही काढू नये. बँकेची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी व प्रतिबंधासह बँकेचे कामकाज चालण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध जारी राहणार आहेत व त्यानंतर त्यांचा फेरआढावा रिझर्व्ह बँक घेणार आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले गेले आहे.

COMMENTS