Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रस्थापितांची सत्ता उधळून लावण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला साथ द्या-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचीआज शेवटची तारीख आहे पण त्याआधीच शेतकरी परिवर्तन महाआघाडीने शेतकर्‍याच्या प

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थाने निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर
भिमाई माझी मायबाप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेशाहू महाराजांच्या विचारावरच माझी राजकीय कारकीर्द -आ.संदीप क्षीरसागर
बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचीआज शेवटची तारीख आहे पण त्याआधीच शेतकरी परिवर्तन महाआघाडीने शेतकर्‍याच्या पोराला सभापती करण्यासाठी वज्रमुठ बांधून  मांजरसुंबा येथे प्रचाराचे नारळ फोडले.गेल्या 40 वर्षापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून शेतकरी,व्यापारी,मापाडी हमाल, इत्यादींचे प्रचंड प्रमाणावर पिळवणूक झाली पण शेतकर्‍यांच्या मालास कवडीमोल भाव देण्याची काम तसेच हमाल मापाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवले असून,व्यापारी बांधवांकरता कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध शेतकरी परिवर्तन महाआघाडीने बीड कृषी उत्पन्न बाजार समिती करिता मोठे धोरण आखले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव देश पातळी घेऊन जाण्यासाठी आणि  शेतकर्‍याच्या पोराला सभापती करण्याचा निर्धार केला असून प्रस्थापितांची चाळीस वर्षाची सत्ता उधळून लावण्याची ही योग्य वेळ असून शेतकरी परिवर्तन महा आघाडीच्या सर्व उमेदवाराला साथ देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आव्हान शेतकरी परिवर्तन महा  आघाडीचे आ संदीप क्षीरसागर, माजी आ सुनील धांडे, माजी आ सय्यद सलीम, काँग्रेसचे रवींद्र दळवी, शिवसेनेचे अनिल जगताप वैजनाथ तांदळे,डॉ बाबु जोगदंड, विलास महाराज शिंदे,शामराव पडुळे,शेख निजाम,नारायण शिंदे,कल्याण आखाडे,डी बी बागल,बबन गवते,गोरक्ष शिंगण, गणेश बजगुडे,नितीन धांडे, सुदर्शन धांडे यांच्या सह आघाडीला पाठिंबा दिल्याले सर्व समाजीक संघटने च्या प्रमुखांनी केला आहे.आज उपस्थित मान्यवराचे हस्ते शेतकरी परिवर्तन महाआघाडीने सन्माननीय सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापारी व व्यापारी यांच्या उपस्थितीत मांजरसुंबा येथे प्रचाराचे नारळ फोडूले असुन याप्रसंगी बालाघाटावरील सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे सदस्य शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

COMMENTS