Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यातून सव्वासहा लाखांचा गुटखा जप्त

एलसीबीची कारवाई तिघांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा : दैनिक लोकमथंनच्या 12 ऑगस्टच्या बातमीची दखल घेत अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीगोंदा येथील गजानन कॉलनीतून सुमारे सव्वासहा ल

व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान : अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण

श्रीगोंदा : दैनिक लोकमथंनच्या 12 ऑगस्टच्या बातमीची दखल घेत अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीगोंदा येथील गजानन कॉलनीतून सुमारे सव्वासहा लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. या प्रकरणी रवी बबन दळवी (वय 39, रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह पांडू ऊर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी (दोन्ही रा. करमाळा, जि. सोलापूर) अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक दिनांक 13 रोजी अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, रवी दळवी (रा. वडळी रोड, गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा) हा करमाळा येथील पांडू ऊर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्याकडुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत व शरीरास अपायकारक होईल असा विविध कंपनीचा पानमसाला व गुटख्याची खरेदी करुन गजानन कॉलनी येथे गोडाऊनमध्ये साठा करुन विक्रीच्या उद्देशाने सुमो गाडीतुन अवैध वाहतूक करतो. त्यानुसार पथकाने नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याच्या शेडमध्ये रवी दळवी हा बसलेला दिसला. त्याच्या गोडाऊनची झडती घेता, गोडाऊनमध्ये विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा मिळुन आला. त्याने पांडू ऊर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्याकडून हा गुटखा विक्रीस आणल्याचे सांगितले. पथकाने टाटा सुमो वाहनासह गुटखा व पानमसाला असा एकूण 6 लाख 16 हजार 204 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत भान्यासंक 123, 223, 274, 275, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोहेकॉ ज्ञानेश्‍वर शिंदे, पोकों आकाश काळे, जालिंदर माने, मयुर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.

COMMENTS