Homeताज्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुटी द्या; सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांचे आवाहन

सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा घटनात्मक हक्क बजावता य

मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम
फुटबॉल विश्वचषक प्रसारणाबाबत दिलासा; पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन
JAWALI Panchayat Samiti Election Result Live 2026: Full Ward-Wise Winner  List from JAWALI Satara Panchayat Samiti जावली (JAWALI) पंचायत समिती  निवडणूक निकाल लाईव्ह २०२६ विजेता उमेदवार, मतांची ...

सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा घटनात्मक हक्क बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी व औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स यांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपूर (पगारी) सुटी द्यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी केले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत ज्या ठिकाणी कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, अशा ठिकाणी मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना ही सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांच्या मालकांनी आणि व्यवस्थापकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांना मतदानासाठी योग्य ती सुटी किंवा सवलत न मिळाल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले, अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी दिला आहे.

COMMENTS