Homeताज्या बातम्या

किशोरी इंग्लिश स्कूलमध्ये एआय, रोबोटिक्स व भविष्योन्मुख शिक्षणासाठी मायरा अकॅडमीसोबत सामंजस्य करार

पालक मार्गदर्शन कार्यक्रमात आधुनिक शिक्षणाचा वेध बीड : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविण्याच्

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा; प्राचार्य यशवंत भोसले यांचे आवाहन
श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी डॉ. शंकर शिवशेट्टे, तर पर्यवेक्षकपदी प्रा. हनुमंत सोट यांची नियुक्ती
शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पालक मार्गदर्शन कार्यक्रमात आधुनिक शिक्षणाचा वेध

बीड : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने बीड येथील ‘किशोरी इंग्लिश स्कूल’ने हैदराबाद येथील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य ‘मायरा अकॅडमी’सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स, मशीन लर्निंग, डिजिटल शिक्षण आणि कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शाळेचे संचालक सीए गिरीश गिल्डा यांनी दिली.

बीड शहरातील सारडा पार्क, एमआयडीसी रोड परिसरात नव्याने सुरू झालेल्या किशोरी इंग्लिश स्कूलला नुकतीच राज्य शासनाची मान्यता मिळाली असून शाळेला यूडीआयएसई (UDISE) कोड (27274100700) देखील प्राप्त झाला आहे. येथे नर्सरी ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, इयत्ता अकरावी व बारावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष पालक मार्गदर्शन कार्यक्रमात मायरा फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष झा, सहसंस्थापक सुधा मॅडम, किशोरी इंग्लिश स्कूलचे संचालक सीए गिरीश गिल्डा, संचालिका सीए कल्याणी सारडा, संतोष लहाने, प्राचार्य सचिन अग्रवाल तसेच १०० ते १५० पालक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनीष झा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, कम्युनिकेशन स्किल्स आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून संवाद कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, डिजिटल साक्षरता आणि सर्जनशील विचारसरणी (क्रिएटिव्ह थिंकिंग) आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांसाठी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करावे, मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रण ठेवावे आणि मुलांशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कम्युनिकेशन लॅब, प्रवाह लॅब, फायनान्शियल लिटरसी लॅब, डिजिटल लॅब, रोबोटिक्स प्रशिक्षण आणि विविध कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद, बेंगळुरू, पुणे आणि चेन्नई येथील उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे मायरा फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

सीए गिरीश गिल्डा यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांच्या लहान वयात विकसित होणारी कौशल्ये त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मजबूत पाया ठरतात. त्यामुळे किशोरी इंग्लिश स्कूलमध्ये नर्सरीपासूनच एआय, कोडिंग, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन स्किल्सचा समावेश असलेले भविष्योन्मुख शिक्षण दिले जाणार आहे. बीड जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि अशा प्रगत लॅब्ज उपलब्ध करून देणारी किशोरी इंग्लिश स्कूल ही एक महत्त्वाची व पहिलीच शैक्षणिक संस्था ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आधुनिक पालकत्व आणि भविष्यातील शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.

COMMENTS