Homeताज्या बातम्याशहरं

सोनं महागले; पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर

दिल्ली : दिवाळीनंतर सराफा बाजारात दररोज उलथापालथ दिसून येत आहे. कधी सोनं स्वस्त तर कधी महाग होत आहे. आज सोन्याचा भाव 130 रुपयांनी वधारला आहे. सोन्यान

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी होणार साडेतीनशे रुपयांत : आरोग्यमंत्र्यांची माहिती
कालिकाईसह संपर्क अ‍ॅग्रोच्या कोट्यवधी फसवणूकप्रकरणी तीन संचालकांना अटक; सातारा अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
म्हसवड पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई: 9 हजार 205 रुपयाचा माल जप्त

दिल्ली : दिवाळीनंतर सराफा बाजारात दररोज उलथापालथ दिसून येत आहे. कधी सोनं स्वस्त तर कधी महाग होत आहे. आज सोन्याचा भाव 130 रुपयांनी वधारला आहे. सोन्याने मागील पाच महिन्यातील उच्चांकी स्तर गाठला आहे.
लग्नसराईचा हंगाम सुरु होण्यापूर्वी दागिन्यांची मागणी वाढली आहे.मागील 10 दिवसात सराफ बाजारात सोने 1650 रुपयांनी महागले आहे.
चांदीमध्ये याच काळात 3400 रुपयांची वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरु होण्यापूर्वी दागिन्यांची मागणी वाढल्याने कमॉडिटी आणि सराफा बाजारात सध्या तेजीचा माहोल आहे. आज मंगळवारी कमॉडिटी बाजारात सोने जवळपास 130 रुपयांनी महागले. दिवाळीनंतर तेजीत असलेल्या सोने आणि चांदीला गेल्या आठवड्यात नफेखोरीचा फटका बसला होता. मात्र काल सोमवारी दोन्ही धातूंनी सकारात्मक सुरुवात केली.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49403 रुपये आहे. त्यात 105 रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव 49340 रुपयांपर्यंत वाढला होता. मागील पाच महिन्यातील एमसीएक्सवरील सोन्याचा उच्चांकी स्तर आहे. एक किलो चांदीचा भाव 66810 रुपये आहे. त्यात 247 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने आज 66719 रुपयांचा स्तर गाठला होता.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार शुध्द सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 49351 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 66967 रुपये आहे. मागील 10 दिवसात सराफ बाजारात सोने 1650 रुपयांनी महागले आहे. चांदीमध्ये याच काळात 3400 रुपयांची वाढ झाली आहे.
मंगळवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47920 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 48920 रुपये आहे. आज दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48240 रुपये इतका आहे. दिल्ली 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 52610 रुपये आहे.
आज चेन्नईत 22 कॅरेटसाठी 46500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50730 रुपये इतका वाढला आहे. त्यात 210 रुपयांची वाढ झाली आहे. कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 48690 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 51390 रुपये इतका आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 1862.81 डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव 25.04 डॉलर प्रती औंस आहे.

COMMENTS