Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांना भारतरत्न द्या : माधवराव तिटमे

अकोले/प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही समाजातील सर्व जातीधर्मातील लोकांसाठी, महिलांसाठी प्रेरणादायी आहे असे प

मी कारवाईला घाबरत नाही व इतरांना उत्तर द्यायला बांधिल नाही ; खा. विखेंनी केले स्पष्टीकरण, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरण गाजणार
खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा
’रेसिडेन्शियल’ विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

अकोले/प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही समाजातील सर्व जातीधर्मातील लोकांसाठी, महिलांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन अकोले तालुका जेष्ठ शिवसेना नेते माधवराव तिटमे यांनी केले.
अकोले येथील शनि मंदिराच्या प्रांगनात सावित्रीबाई फुले वाचनालय, अकोले व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई ज्योतिबा  यांच्या 192 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माधवराव तिटमे बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ  उद्योजक मारुती बनकर होते. या वेळी बोलताना म्हणाले की, सावित्रीबाई दूरदृष्टीपणामुळे आज महिलांना समान अधिकार मिळाले आहेत. फुले  दांपत्याचे काम देशांमध्ये मोठे असून त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली.
      यावेळी प्रमोद मंडलीक व राम रुद्रे म्हणाले आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू पुण्यात देशाविदेशातून शिक्षण घेण्यासाठी विदयार्थी येतात. आज शेकडो वर्षांपासुन पुणे हे विद्येचे माहेर घर ओळखले जाते. गोर गरीब व बाहेरच्या विद्यार्थ्यांना सर्व युक्त सोयीसाठी व शिक्षणासाठी पुण्याच्या भिडे वाड्यात बालवाडी व 1ली ते पीएच. डीपर्यंत शिक्षसासाठी एकखिडकी योजना सर्व करून सर्व समावेशक शैक्षणिक संकूल उभे करावे,असे स्पष्ट विचार सामाजीक कार्यकर्ते वसंत बाळसराफ यांनी मांडले. भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे आणिल कोळपकर, ज्ञानेश पुंडे, ग्राहकपंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, अनिल कोळपकर, ज्ञानेश पुंडे ,संतोष खांबेकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रमेश राक्षे, सुरेश गायकवाड, गणेश कानवडे, पंडित वाकचौरे, नरेंद्र देशमुख, विठ्ठल पांडे, कैलास पुंडे, रणजीत खैरे, सखाहारी पांडे, भाऊसाहेब वाकचौरे, शुभम खर्डे, गोपीनाथ मंडलिक, सुदाम मंडलिक, धनंजय संत, बबनराव तिकांडे, दत्ता शिंदे, अशोक ताजणे, मच्छिंद्र चौधरी. आदीउपस्थित होते. सुत्रसंचालन राम रूद्रे व आभार ज्ञानेश पुंडे यांनी मानले.

COMMENTS