महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांचा जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग आणि हवामान अद्य

राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड
शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी दिल्या कृषि उद्योजकांच्या प्रकल्पांना भेटी
कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी

डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांचा जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग आणि हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन आठवड्याचे प्रशिक्षण महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजीत करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणाचा विषय प्राध्यापक व शैक्षणीक कर्मचार्यांची श्रेणी सुधारण्यासाठी त्यांना इरिकॅड सॉफ्टवेअरचे प्रगत तंत्रज्ञान देणे हा होता. जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग आणि मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग यांच्या शैक्षणिक कर्मचारी वर्गाला जलसिंचन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक तंत्र प्रणाली व त्यांचा वापर या बाबत सजग आणि प्रशिक्षित करणे, तसेच लिंक्लोन अग्रिटेक, न्यूझीलंड यांच्याद्वारे विकसीत इरिकॅड प्रणाली याचे प्रात्यक्षिक उपलब्ध करून देणे, ही ह्या प्रशिक्षणाची उद्दिष्टे होती.

इरिकॅड प्रणाली ही नलिका जलसिंचन पद्धतीच्या क्षेत्रातील प्रारूप रेखांकनामध्ये संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ह्याचा वापर छोट्या शेती क्षेत्राच्या ठिबक सिंचन पासून ते मोठ्या जलसिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रापर्यंत केला जातो. मुंबई येथील इरीकॅड प्रणाली रेखांकन प्रशिक्षक अभियंता श्री. एम.एस. कायंदे यांनी या प्रशिक्षणामध्ये इरिकॅड प्रणालीचे टूलबार, इरिकॅड रेखांकन सुविधा, जल पुरवठा असणार्या सरल व्यवस्थेचा आराखडा तयार करणे, जलसिंचनासाठी योग्य त्या नलिकांची निवड करणे किंवा वाहकता आणि दाब यावर आधारित आकार निश्चिती करणे, साध्या टर्फ ची आखणी करणे विविध तुषार सिंचक व ठिबक सिंचन आराखडा विशिष्ट क्षेत्रासाठी जल पुरवठा निश्चिती करणे या विषयांवर मार्गदर्शन केले.

डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी फुले जल आणि फुले इरिगेशन शेड्युलर ह्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्याद्वारे विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती दिली आणि त्या विकसित केलेल्या प्लिकेशन्सचे इरिकॅड प्रणालीमध्ये, इरिकॅड द्वारे आरेखित केलेल्या शेतांच्या सिंचन वेळापत्रकासाठी एकात्मिकरण सुचविले. न्यूझीलंड येथील रेनर जलसिंचनचे माजी सिंचन आरेखन सल्लागार श्री. ग्रॅहम मॅकडॉगल हे ऑनलाइन पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी इरिकॅड प्रणालीची संभाव्यता आणि ठिबक सिंचनासह नलिका सिंचन प्रणालीच्या आरेखनामध्ये त्याची उपयोगिता यावर मार्गदर्शन केले.

यावेळी आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. एम.एस. माने, कार्यक्रमाचे संयोजक व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, राष्ट्रीय कृषि विकास योजना व इमी प्रकल्पाचे संशोधन सहयोगी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी प्रमुख डॉ. एन एन फिरके आणि सह प्रमुख संशोधक डॉ एम. जी शिंदे यांनी सह संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली. या प्रशिक्षणाचे संयोजन सचिव म्हणुन जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस.बी. गाडगे यांनी काम पाहिले.

COMMENTS