Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराण या ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील तहसी

सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
 सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराण या ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजबांधवांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास भारतीय जनता पक्ष,शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍यांनी भेट देऊन या उपोषणास व मुस्लिम समाजाने केलेल्या न्यायिक मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन,कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्याची घटना अतिशय निंदनीय असून,या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून कडक शिक्षा करावी. अशी मागणी केली.

 या प्रकरणावर तातडीने योग्य ती कारवाई व्हावी. कारण सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दूषित होते. तसेच हे केवळ कुराणबद्दल नाही तर इतर कोणत्याही धर्माच्या बाबतीत घडू नये. असे मत अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले, कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या कुराण या पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कायमच सर्वधर्मसमभाव जोपासून कोपरगाव शहर व तालुक्यात सामाजिक एकता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बिपीन कोल्हे, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबीय आजही कोपरगाव तालुक्यात सामाजिक व धार्मिक सलोखा व शांतता राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवून विधायक काम करत आहेत. आज समाजकंटकांनी कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केली, अशा अपप्रवृत्तींवर वेळीच कडक कारवाई न केल्यास भविष्यात इतर धर्माच्या बाबतीतही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी. अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई होत नाही. उपोषणकर्त्या मुस्लिम समाजबांधवांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.  

यावेळी माजी उपनगराध्यक्ष अल्ताफभाई कुरेशी, आरिफभाई कुरेशी, रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक बबलू वाणी,संदीप देवकर,दीपक जपे, सद्दामभाई सय्यद, नसीरभाई सय्यद, शफिकभाई शेख, जितेंद्र रणशूर, सोमनाथ म्हस्के, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई, फकिर मोहम्मद शेख पहिलवान, शिवाजीराव खांडेकर, इलियासभाई खाटिक, एस. पी. पठाण, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, ज्ञानेश्‍वर गोसावी, रंजन जाधव, पप्पू पडियार, प्रसाद आढाव, जगदीश मोरे, सागर जाधव, राजसिंग भाटिया, संतोष नेरे, संतोष साबळे, गोपी गायकवाड, अकबर लाला शेख, फिरोज पठाण, सिद्धार्थ साठे, विजय चव्हाणके, रोहित कनगरे, स्वप्नील मंजुळ, संदीप शिरसाठ, रवींद्र कुंदे, युवराज शिरसाठ, संजय खरोटे, निखिल जोशी, गौरीश लोहारीकर, वैभव सोळसे, अमोल बागुल, भैय्या नागरे, हाशमभाई पटेल, रहीमभाई शेख, अल्ताफभाई पठाण, अन्वरभाई शेख, सादिकभाई पठाण (मुर्शतपूर), शब्बीरभाई तांबोळी (कोळपेवाडी) आदींसह भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS