Homeताज्या बातम्याविशेष लेख

नाक तोंड दाबून बुक्कीचा मार ! कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क चुकीचा !   

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून शेती विकासाला चालना देत असताना अगोदर शेतकरी यांनी आपल्या राज्याचा विचार करून आहे त्या परिस्थितीत डिजिटल

शब्दगंधची ऑनलाइन श्रध्दांजली सभा उत्साहात
नुपूर शर्माने संपूर्ण देशाची माफी मागावी ; सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले
एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून शेती विकासाला चालना देत असताना अगोदर शेतकरी यांनी आपल्या राज्याचा विचार करून आहे त्या परिस्थितीत डिजिटल इंडिया वा इंडस्ट्री क्षेत्रांत झेप घेतली. राज्यातील शेतकरी वर्गाने आज पर्यंत सहकाऱ्याची भावना दाखवली आणि त्यातून एककीकडे उत्क्रांती झालेली दिसते तर दुसरीकडे पडलेले चेहरे आजही उंबरठे जिझवत आहेत. घाम गाळणाऱ्या व्यक्तीचं रोजंदारीच मूल्य वाढलेलं दिसतं आहेत परंतु शेतकरी वर्गाला काय यातना आणि गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते याकडे कुणी लक्ष घालणार आहेत का ? नाशिक जिल्ह्यासह राज्य आज रोजी तरी दुष्काळग्रस्त असून मुख्यतः जिल्ह्यासह राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत।

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के सर्रास वाढ केल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत. शेतकरी वर्ग प्रामुख्याने सरकार विरोधी नसून त्यांच्या लादल्या जाणाऱ्या धोरणांवर प्रचंड प्रमाणात नाराज झालेला आहेत. व्यक्तीगत प्रत्येक शेतकरी कुटुंबात खूपच कलह ,कर्ज सतरा भानगडी आजच्या रोषाला कारणीभूत ठरत आहेत. 

स्वामीनाथन आयोगाचे काय ? हमी भाव काय असतो ? आम्हाला अजून ही माहीत न व्हावे या पेक्षा आमचे दुर्भाग्य काय ? केमिकल युक्त औषधे भरमसाठ वाढून शेतकऱ्यांना राजरोजपणे फसवले जात आहेत. मूलतः कांदा बी निर्मिती प्रकिया हा शेतकरीच करत असतांना डुप्लिकेट बियाणे घेण्यावर एवढी बळजबरी का ? असे विविध प्रश्न आता उजेडात येण्याची शक्यता आहेत। संतप्त प्रतिक्रिया येत असतांना त्यात निसर्गाने केलेली कुचंबना अशा दुहेरी संकटात शेतकरी राजा आज ही शेतमालाची भिकच मागत असतो. पिकलेल्या मालावर आजही त्यास मोल लावता येत नाहीत हीच मोठी खंत आहेत.  

किमान हमी भाव व औषधांवर नियंत्रण एवढी माफक अपेक्षा असताना का अजूनही यंत्रणा शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत नाहीत. हीच मोठी शोकांतिका ! एका रात्रीत असे भयावह निर्णय बदलून जात असतील तर शेतकरी वर्गाचे भविष्य शेंद्रीय शेती कशी करावी असे सांगून सांगून नक्कीच खराब होईल ? 

केंद्र सरकारने लावले निर्यात निर्बंध  – टोमॅटो पाठोपाठ कांद्याचे भाव वाढू नये त्यामुळे ३१ डिसेंबर अखेर बाहेर पाठविणाऱ्या व्यापाऱ्यास ४० टक्के निर्यात शुक्ल लावले आहेत. कांद्याचे देशात भाव स्थिर रहावे उपलब्ध साठा व त्यावर योग्य मोबदला असे सरकारचे काहीसे धोरण असल्याचे कळते आहेत 

कांदा ग्राहकांचा बोलबाला – भारतीय बाजारपेठेत येणारा कांदा सर्व सामान्य ग्राहकांना खरेदी करता यावा टोमॅटो चे भाव अचानक वाढल्याने सरासरी दोन महिने सामान्य जनतेला टोमॅटो खरेदी करता आला नाहीत त्याच धर्तीवर ग्राहकांचे हाल होऊ नये म्हणूनच की काय उपलब्ध असलेला कांदा सरकार माफक दराने ग्राहकांच्या झोळीत टाकेल 

व्यापारी वर्गास जास्त अडचण नाहीत – खरेदी केलेला कांदा जास्त प्रमाणात साठवून ठेवण्याची व्यवस्था व्यापारी वर्गाकडे पुरेशी आहेत त्यामुळे डिसेंबर पर्यंत खरेदी केलेला कांदा माल जानेवारी फेब्रुवारीत देखील ते निर्यात करू शकतील

शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागणार की काय ?  – केंद्राकडून घेतलेल्या निर्णय हा शेतकरी हिताचा नसल्याने शेतकऱ्याचे नुकसानीचे प्रमाण वाढणार आहेत राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहेत.किमान खर्च केलेला पैसा सुटावा ही भीती राज्यातील शेतकऱ्यांना चिंतेत टाकत चाललेली आहेत। 

राज्यातील लोकप्रतिनिधी  शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता – कांद्याच्या निर्यात धोरणा बाबतीत केंद्र सरकारने व्यापारी वर्गास ४० टक्के शुल्क लावल्याने शेतकरीच अडचणीत येणार आहेत आत्ता कुठे १५०० ते २००० भाव ऑगस्ट २०२३ मध्ये  मिळायला लागले. अन मध्येच सरकारी धोरण  देखील अशी चेष्टा करतांना दिसत आहेत त्यामुळे अवकाळी पावसागत शेतकऱ्याचं जीनं झालेलं आहेत. कांदा विषय घेऊन प्रत्येक शेतकरी संघटना राजकीय पक्ष आक्रमक होतांना दिसत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पडेल तेव्हाच खरे म्हणावे.

योगेश रोकडे नाशिक – ९४२२८९२१९८

COMMENTS