Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्कारक्षम पिढी घडविणे हे शिक्षणाचे ध्येय असावे ः माजी मंत्री टोपे

कोपरगाव प्रतिनिधी ः मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पहि

पुणतांब्यातील 17 कोटी रूपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात
संगमनेरच्या उपकारागृहातून चार कैदी फरार
सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी ः मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पहिले दोन गुण आहेत आणि तिसरा गुण प्रामाणिपणाच नाही तर पहिल्या दोन गुणांची किंमत शुन्य होते. म्हणुन शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये  प्रामाणिपणाचे रसायन भरले तर भविष्यात  कोणतही वादळ-वारं त्यांना विचलीत करणार नाही. यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे, हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसम्मेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन टोपे बोलत होते. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम उपस्थित होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सुब्रमण्यम यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर टोपे यांचे हस्ते विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबध्दल पारितोषिके  देवुन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. मनाली कोल्हे यांनी राज्य व देश पातळीवर विध्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात अनेक पदकांची कमाई केल्याचे सांगीतले. तसेच विध्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आधुनिक ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली मिनी एमबीए, यंग सॉफ्टवेअर, रोबाटिक्स, कोडींग आणि फॅशन डीझाईनचे अभ्यासक्रम विनामुल्य शिकविले जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलतंना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की संजीवनी शैक्षणिक  समुहाने उत्तम शैक्षणिक दर्जा राखल्याने आज संजीवनीचे माजी विध्यार्थी संपुर्ण जगात मोठ्या  पदांवर कार्यरत आहे. श्री टोपे यांनी कोविड काळात उत्कृष्ट परिस्थिती हाताळली, याबध्दल त्यांनी त्यांच्याबध्दल गौरवोद्गार काढले. या वर्षी सांस्कृतिक  कार्यक्रमासाठी ‘नृत्य’ या संकल्पनेवर विविध राज्यातील पारंपारीक नृत्ये सादर केली.

COMMENTS