HomeUncategorized

कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या

कराड/ नगरपालिकेच्या कचरा गोळा करण्याचा ठेका असलेल्या ठेकेदाराची मनमानीपुढे कराडकर वेठीस धरले गेले. सकाळ- सकाळी पळणार्‍या घंटागाड्या एका जागेवरच थ

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात पहिले; कराडची हॅटट्रीक चुकली; पहिल्या दहामध्ये पाचगणीसह कराडचा समावेश
सातारा जिल्ह्यातील युक्रेनमधून सर्व विद्यार्थी सुखरुप परतले; जिल्हा प्रशासनाची माहिती
बेकायदेशीररित्या बस चालविल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

कराड/ नगरपालिकेच्या कचरा गोळा करण्याचा ठेका असलेल्या ठेकेदाराची मनमानीपुढे कराडकर वेठीस धरले गेले. सकाळ- सकाळी पळणार्‍या घंटागाड्या एका जागेवरच थांबवण्यात आलेल्या आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचार्‍यांचे पगार रखडल्याने तसेच गेले दोन वर्ष बोनस न मिळाल्याने आज घंटागाड्या जागेवरच उभ्या राहिल्या.
कराड नगरपरिषद स्वच्छ सुंदर शहर म्हणून देशपातळीवर झळकली आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे. परंतु या घंटागाडी कर्मचार्‍यांवर मात्र, मोठा अन्याय होत आहे. सदरचा अन्याय हा ठेकेदार करत असून कर्मचार्‍यांची होणारी पिळवणूक नगपालिका प्रशासनाला दिसत नाही का असाही सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. ठेकेदाराने दोन वर्ष बोनस दिला नाहीच परंतु या कर्मचार्‍यांचा पगारही थकवला जात आहे. तेव्हा या ठेकेदारावर आता कारवाई होणार की मागे तेच पुढे पहायला मिळणार.
शहरात रस्त्यावर कचरा पडू नये, म्हणून सकाळ-सकाळी घंटागाडी गलोगल्ली पळत असतात. परंतू आज केवळ नगरपालिकेच्या ठेकेदाराने आपली मनमानी केल्याने सर्व गाड्या यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टॉऊन हॉल) येथे उभ्या राहिलेल्या आहेत. एकही गाडी बाहेर पडली नाही. त्यामुळे आता घरातील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्‍न नागरिकांच्या समोर उभा राहिला आहे. यावर मेहरबान जाब विचारणार की आता आपण माजी झालो म्हणून ठेकेदाराचे हित जोपासणार हे पहावे लागणार आहे. कराड शहरातील मेहरबान शहरातील प्रश्‍नांवर केवळ सत्तेत असताना किंवा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागे होणार असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून विचारला जावू शकतो.
नगरपालिका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे. लवकरच हा प्रश्‍न मिटवला जाईल. तसेच कराड शहरातील स्वच्छतेचे व कचरा गोळा करण्याचे कामही करून घेतले जाईल. नागरिकांची गैरसोय होवू दिली जाणार नाही. परंतू यामधील दोषीवर कारवाई केलीच जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

COMMENTS