Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्यादरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन होणार

म्हसवड / वार्ताहर : श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्या दरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन घेण्याची सोय करून देण्यात आली असल्याचे देवस्थ

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची आज पुण्यतिथी
महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे
दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा

म्हसवड / वार्ताहर : श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्या दरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन घेण्याची सोय करून देण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले.
म्हसवड, ता. माण येथील विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असणार्‍या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या पाषाणमूर्तींना वज्रलेप करण्याच्या सोहळ्यास मंगळवार, दि. 6 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या वज्रलेप सोहळ्यास तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान मंदिराचा गाभारा बंद राहणार आहे अर्थात श्रींच्या पाषाणमूर्तींचे दर्शन भाविकांना होणार नाही. गरुड खांबापासून भाविकांना बंद गाभार्‍याचे दर्शन घ्यावे लागणार होते.
यामुळे तमाम भाविक व ग्रामस्थ यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. ही अडचण लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टकडून भाविकांच्या सोयीसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार आता गाभार्‍यामध्ये श्री सिध्दनाथ यांच्या पाषाण मूर्तीच्या उजव्या बाजूला एका छोट्या कोनाड्यामध्ये, वर्षभर एका छोटेखानी दिवानावरील गाद्यांवर विराजमान असणार्‍या श्रींच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायम ठेवलेल्या असतात. ज्या रथयात्रेदिवशी रथात विराजमान केल्या जातात. त्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती गरुड खांबाजवळ ठेवण्यात येणार आहे. तमाम भाविक व ग्रामस्थांना या उत्सव मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या या निर्णयामुळे तमाम भाविक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अभिषेक, श्रींचा पोशाख, दहीभात पूजा, आदी धार्मिक विधी वज्रलेप सोहळ्या दरम्यान बंद राहणार आहेत. याचीही तमाम भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच या वज्रलेपच्या दरम्यान ज्या भाविकांना वज्रलेप सोहळ्यासाठी देणगी द्यावयाची असेल, त्यांनी श्री सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. रितसर देणगी पावती घ्यावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS