Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद; पिस्तुलासह कोयता जप्त

पुणे/प्रतिनिधी ः विविध ठिकाणच्या महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरणार्‍या चोरट्यांच्या टोळीला पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस प

मायबापाची मान खाली जाईल असे वागू नका-हेडकॉन्स्टेबल श्रीमती जाधव
बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात
Yeola : येवला नगरपालिकेत विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन अनावरण (Video)

पुणे/प्रतिनिधी ः विविध ठिकाणच्या महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरणार्‍या चोरट्यांच्या टोळीला पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात पकडण्यात यश आले आहे. संबधित चोरट्यांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, कार, कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दत्ता अशोक शिंदे (वय 28, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे), सचिन लक्ष्मण भोसले (वय 39, रा. आष्टी, जि. बीड), सचिन अशोक बेलदार (वय 21, रा. येवला, जि. नाशिक), मल्हार अंबादास अडागळे (वय 24, रा. रवळगाव, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी चोरट्यांची टोळी मोटारीतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून चारजणांना पकडले आहे. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मामा रिकिबे (रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) पसार झाला. पोलिसांनी चोरट्यांकडून कार, देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, कोयता असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर चोरट्यांनी शिरुर, यवत, तसेच मिरजगाव परिसरात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची कबुली दिली आहे. त्यांनी अन्य आणखी कोणत्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली आहे. तसेच त्यांच्या आणखी साथीदार कोण आहेत याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, उपनिरीक्षक मीरा मटाले, संजय नागरगोजे, हवालदार संजय देवकाते, नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जाधव आदींनी ही कारवाई केली आहे.

COMMENTS