Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात गायरान धारकांचा अंबाजोगाईत निघाला धडक मोर्चा

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई तालुक्यात कसत असलेल्या गायरान जमिनी नियमाकुल करण्यासाठी गायरान धारकांनी मूळ कागदपत्रे व पुराव्यासहित प्रस्ताव ता

शिवसेनेच्या 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत
गेम चेंजर महिला नेत्या !
साईनगरीत 29 व 30 एप्रिलला शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन ः डॉ. संजय मोरे

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई तालुक्यात कसत असलेल्या गायरान जमिनी नियमाकुल करण्यासाठी गायरान धारकांनी मूळ कागदपत्रे व पुराव्यासहित प्रस्ताव तालुका स्तरावर दाखल केलेले आहेत. परंतु महसूल विभागाकडून वहीतिची नावे न केल्यामुळे प्रकरणे धुळकात पडून आहेत. पंजाब न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन गायरान धारकांना व घर धारकांना नोटीसा देण्यात येत आहेत. गायरान धारकांवर अन्याय करणारा निर्णय मागे घेण्यासाठी व दिलेल्या नोटीसा रद्द करण्यासाठी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून आज मंगळवार (दि.13) जून रोजी अंबाजोगाई रिपाइंच्या वतीने तहसील कार्यालयावर तालुका अध्यक्ष दशरथ सोनवणे व दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून खालील मागण्यांचे निवेदन तहसीलदार अंबाजोगाई यांना देण्यात आले.  नांदेड येथील अक्षय भालेराव व लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरीरत्न तबघाळे यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. जमीन धारकांना व घर धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करून निर्णय मागे घेण्यात यावा. सन 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासन निर्णयाची मुदतवाढ 2005 पर्यंत करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दशरथ सोनवणे, मनोज इंगळे, दीपक कांबळे, प्रमोद दासूद, विष्णू वाघचौरे, गणेश टेकाळे, किरण खंडागळे, मिलिंद तरकसे, गणेश टेकाळे, राहुल गंडले, संदिपान गायकवाड, विलास भागवत, तुकाराम चाटे, चिंतामण तरकसे, सुनील तरकसे, दादाराव मस्के, लिंबा कांबळे,, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब लांडगे, भारत देवधर, भास्कर मस्के, गुणाजी मस्के, बाबासाहेब मस्के, राजेभाऊ गायकवाड, वंदना जोगदंड, गंगाधर वाघमारे, लिंबा कांबळे, छत्रभुज कांबळे, मच्छिंद्र कांबळे, सुनील वेडे, अशोक वेडे, केशव हिरवे, भानू मस्के, आनंद बनसोडे, विमल गोरे, बाबासाहेब गोरे, शिवाजी वाघमारे यांच्यासह शेकडो गायरान धारक व घर धारक मोर्चात सामील होते.

COMMENTS