Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठवडे बाजारातून चार मोबाईल लांबवले

राहुरी येथील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील आठवडे बाजारातून बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी चोरट्यांनी चार मोबाईल लांबवले. यात दहा हजार रुपये किमत

कोपरगाव नगरपरिषदेकडून मतदान स्पर्धेचे आयोजन ः मुख्याधिकारी जगताप
मालिकांच्या राजीनाम्यासाठी अहमदनगरमध्ये भाजपचे आंदोलन | LOKNews24
अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर

अहमदनगर/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील आठवडे बाजारातून बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी चोरट्यांनी चार मोबाईल लांबवले. यात दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, नऊ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, सात हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा 31 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी उल्हास छबुराव गायकवाड (वय 61, राहणार नांदगाव, तालुका राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस नाईक खंडागळे करीत आहेत.

चोरट्यांनी आता आठवडे बाजार वा अन्य गर्दीच्या ठिकाणी जमलेल्यांच्या खिशातून त्यांचे मोबाईल लांबवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. नगर शहरात व जिल्हाभरात अशा घटना वाढत आहेत. या मोबाईल चोरांना पकडण्याचे आव्हान पोेलिसांसमोर ठाकले आहे.

COMMENTS