Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुळकोटी ग्रामपंचायतीत उपसरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव मंजूर

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील पुळकोटी ग्रामपंचायत येथे दि.13 ऑक्टोंबर रोजी उपसरपंच सोमनाथ चंद्रकांत यादव यांच्या विरोधात दाखल झालेला अवि

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात
LOK News 24 I दखल काँग्रेसची बदनामी सुरु l

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील पुळकोटी ग्रामपंचायत येथे दि.13 ऑक्टोंबर रोजी उपसरपंच सोमनाथ चंद्रकांत यादव यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
सदस्य वैभव युवराज बनगर यांनी दि. 8 ऑक्टोंबर रोजी उपसरपंचांविरोधात अप्पर तहसीलदार म्हसवड यांचेकडे अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता अप्पर तहसीलदार सौ. बाबर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सरपंच मच्छिंद्र जयाप्पा गलांडे, सदस्य वैभव युवराज बनगर, नयन शंकर सातपुते, सौ. वैशाली ब्रह्मदेव यादव, सौ. प्राजक्ता ऋषिकेश केंगार आणि सौ. प्रियांका विठ्ठल सातपुते हे सहा सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच सोमनाथ चंद्रकांत यादव आणि सदस्य सौ. लता बाळू सावंत हे गैरहजर राहिले. बैठकीत उपस्थित सहा सदस्यांनी एकमताने, 6 विरुध्द 0 मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर केला. या बैठकीस अप्पर तहसीलदार सौ. बाबर, सर्कल अकडमल, तलाठी बदडे, ग्रामसेवक आवटे तसेच पोलीस पाटील सोनिका बनसोडे उपस्थित होत्या.

COMMENTS