पोखरणांचे कॉल रेकॉर्ड व बँक स्टेटमेंट तपासण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोखरणांचे कॉल रेकॉर्ड व बँक स्टेटमेंट तपासण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : निलंबित शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीमध्ये मोबाईलचे कॉल रे

आगाऊ पिकविमा भरपाई द्याः आ. काळे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
LokNews24 l बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ

अहमदनगर/प्रतिनिधी : निलंबित शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीमध्ये मोबाईलचे कॉल रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट घेऊन न्यायालयाला याबाबत अवगत करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सिव्हील जळीतकांडातील आणखी एका जखमीचे उपचार सुरू असताना निधन झाल्याने या दुर्घटनेतील बळींची संख्या 14 झाली आहे.
जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तपासकामी निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांच्या मोबाईलचा सिडीआर, कॉल रेकॉर्ड मागविण्यात यावेत तसेच त्यांच्या नावे असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट गुन्ह्याच्या तपासकामी घेण्यात यावे. तसेच हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्यांच्या राहत्या घराची झडती घेऊन, त्यातून मिळालेले पुरावे न्यायालयासमोर सादर करावेत, अशी मागणी उपजिल्हा प्रमुख जाधव यांनी केली आहे. निलंबित शल्य चिकित्सक हे कार्यरत असताना कटप्रॅक्टीस करुन जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण इतर हॉस्पिटल व डॉक्टरांकडे पाठवित होता व त्यामधून मिळणारे कमिशन तो घेत होता, असे खात्रीलायक समजते. त्यामुळे या निलंबित शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा याच्या खात्यावर कोणकोणत्या हॉस्पिटल व डॉक्टरांकडून पैसा जमा झाला आहे, हे समोर येईल, असा दावा करून जाधव यांनी म्हटले की, त्याचा सत्यशोधक तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व गैरकारभाराची, कटप्रॅक्टीसची साखळी समोर येऊन दोषीवर कारवाई करणे सोयीचे होईल, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.

14 वा निष्पाप बळी
जिल्हा रुग्णालयामधील कोविड अतिदक्षता कक्षामध्ये आग लागून सुरुवातीला 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या वाढली असून खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रंभाबाई अंजराम विधाते (वय 80) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 14 झाली आहे. 6 नोव्हेंबरला या कोविड कक्षाला आग लागली होती. यावेळी कक्षात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 14 रुग्ण दगावले असून, दोन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर एका रुग्णास उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमध्ये मृत झालेल्या एकाची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. पोलीस प्रशासनाने या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा केले आहे. साधारणत: 58 वर्षे वयाचा हा पुरुष असून तो जिल्हा रुग्णालयाच्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. त्याची ओळख पटलेली नाही.

COMMENTS